नेशन न्यूज मराठी टीम.
हिंगोली / प्रतिनिधी – हिंगोली जिल्ह्यात खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत सर्व शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांसह असंख्य कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. 27 ऑगस्ट रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेसाठी हिंगोली जिल्ह्यातून लाखांच्यावर शिवसेनेच्या या सभेला येणार, असे माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा बोलताना म्हणाले. ही सभा मराठवाड्यातली सर्वात मोठी सभा होणार असल्याचे सांगितले. ही जबाबदारी ज्या त्या पक्षसंघटन करणाऱ्या शिवसैनिकाने घेऊन येण्याचे आव्हान केले.
हिंगोली संपर्कप्रमुख विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं हिंगोली जिल्हा आजन्म शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आणि तो कायम राहील. सभेसाठी सैनिक कसे आणायचे त्यासाठी गावोगावी निमंत्रण द्यायचे आहे. माणुसकीचा झरा कायम करायचा असेल तर माणुसकी जपली पाहिजे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व हिंगोली जिल्हाप्रमुख बबनराव थोरात हे तालुका निहाय बैठक घेणार आहोत. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने एकदिलाने काम करावे, असे विनायक राऊत म्हणाले.
चंगुमगु जे तीन जिल्ह्यामध्ये नाचतायत. त्यांच काहीच चालत नाही. 27 ऑगस्टला सभा जाहीर होताच परभणीला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेतला. केवळ आपली छबी उमटविण्यासाठीच. ज्यांनी तुम्हाला राजकीय वारसा दिला त्यांना गद्दार होऊन 50 खोके पेरायचा कोणीही काहीही प्रयत्न करा. पण हिंगोली जिल्ह्यात लाखोच्या संख्येने शिवसैनिक येऊन ही सभा होणार आहे. भाजपाचं दुकान चॉईस करुन 40 गद्दार गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत, असा हल्लाबोल विनायक राऊतांनी केला.
नितीन गडकरींनी आता भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाला आव्हान देण्याची गरज आहे. नितीन गडकरींना केंद्रीय सत्तेतून बाद कऱण्याचं कूटीर कारस्थान चालू आहे, त्याची महाराष्ट्राने गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे. कॉंग्रेस पक्षाने जसं बाळासाहेबांच्या मराठी बाण्याला पाठिंबा दिला होता, तसंच नितीन गडकरींचं इंडिया आघाडीमध्ये स्वागत होईल, असे देखील खासदार विनायक राऊत म्हणाले आहेत.