नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – प्रलंबित असलेली मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक , कोरोना काळानंतर होत होती. त्यासाठी अनेक विद्यार्थी संघटनांनी पदवीधर मतदार नोंदणीसाठी दिवस-रात्र मेहनत घेतली होती. या प्रक्रियेमध्ये आपल्या वेळ, पैसा, श्रम ओतले होते. अशावेळी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन, महिला संघटन, युवा संघटन यांनी सिनेट निवडणुकीमध्ये दिनांक 17 ऑगस्ट रोजी नऊ अर्ज दाखल केले आणि 18 ऑगस्ट या शेवटच्या दिवशी उर्वरित आणखी अर्ज दाखल होणार होते. आणि तेव्हाच 17 ऑगस्टला रात्री साडेअकरा वाजता विद्यापीठ अधिसभेने सिनेटची निवडणूक स्थगित केल्याचे परिपत्रक जाहीर केले. हे आम्हाला सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्या यांच्यामार्फत कळले. आमच्या संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि उमेदवार ,17 ऑगस्टला संध्याकाळी साडेसहापर्यंत मुंबई विद्यापीठ निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालया बाहेर उपस्थित होतो. पण त्यावेळी कोणत्याही कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांनी याची आम्हाला कल्पना दिली नाही. आणि रात्री उशिरा गुपचूप अशा पद्धतीने परिपत्रक जाहीर केले. विद्यापीठ जर निवडणूक स्थगित करणार होत,मग विद्यापीठाची वेबसाईट रात्रीपर्यंत उमेदवारांचे online पैसे का स्वीकारत होती? यांच ऊत्तर प्रशासनाने द्यावे.या संदर्भात मुंबई विद्यापीठ निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
साधारणपणे फुले- आंबेडकर विचाराच्या संघटनांनीच उमेदवारी अर्ज दाखल करण्यामध्ये बाजी मारली होती. इतर पारंपारिक विद्यार्थी संघटनांनी अद्याप अर्ज दाखल केले नव्हते. सम्यक विद्यार्थी आंदोलनाने अनेक समविचारी शिक्षक आणि विद्यार्थी संघटनांना एकत्र घेऊन नवीन शैक्षणिक धोरणा विरोधात, मोर्चे- आंदोलन आणि परिषदा घेतल्या. New education policy विरोधात या निवडणुकीमध्ये आम्ही रान उठवणार होतो. सरकारने जे 5+3+3+4 (पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार) या नवीन शैक्षणिक आकृतीबंधामुळे , सरकारी शाळा, कॉलेज बंद पडण्याच्या वाटेवर आहेत. त्याचप्रमाणे विद्यापीठामध्ये अशास्त्रीय कोर्स उदाहरणार्थ ज्योतिष शास्त्र, अंकशास्त्र , हस्तरेषाशास्त्र अशा कोर्सेस ना आम्ही विरोध करणार होतो.
मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या कॉलेजेसमध्ये साधे प्रसाधनगृह नाहीत.सॅनिटरी नॅपकिन्स पुरवणारे मशीन नाहीत. मुंबई विद्यापीठासारख्या भरपूर आणि मोक्याच्या जागा राखून असलेल्या विद्यापीठाच्या जमिनीवर काही भांडवलदारांचे लक्ष आहे त्यांना या जमिनी गिळंकृत करायच्या आहेत, त्यामुळे विद्यापीठाच्या विकासासाठी लागणारा पैसा केंद्र सरकारने देणं बंद केलं आहे . आणि हळूहळू हे विद्यापीठ, त्याचे विभाग खाजगी भांडवलदारांना देण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असा आमचा आरोप आहे. आणि त्याचाच परिपाक म्हणजे विद्यापीठाच्या मोक्याच्या जागा काही लोकांना अलॉट करण्याचं षडयंत्र रचलं गेलेल आहे आणि त्या विरोधात आमची सम्यक विद्यार्थी आंदोलन ही वंचित बहुजन आघाडी प्रणित संघटना या विरोधात मैदानात उतरली होती.
ऐतिहासिक मुंबई विद्यापीठ वाचविण्याचे जबाबदारी, नवीन शैक्षणिक धोरणाला विरोध या कृती कार्यक्रमासहित आम्ही मैदानात उतरलो होतो. त्यालाच कुठेतरी शह देण्यासाठी, विद्यापीठाने सिनेट पदवीधर निवडणुका, संपूर्ण कार्यक्रम जाहीर केलेला असताना, आयत्या वेळेस स्थगित केला असा आमचा जाहीर आरोप आहे. आम्ही विद्यापीठाच्या या कृतीचा जाहीर निषेध करतो. असे निवेदन महेश भारतीय, समन्वयक,महाराष्ट्र प्रदेश ,सम्यक विद्यार्थी आंदोलन यांनी दिले आहे.