नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती / प्रतिनिधी – अमरावती जिल्ह्यातील माहुली जहांगीर येथे गोदामात अनधिकृत व विनापरवानगी साठवणूक केलेल्या 11579 रासायनिक, सेंद्रिय खतांच्या बॅग व द्रवरूप खतांचा साठा असा २ कोटी ३८ लाखांचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
आंध्र प्रदेशात नोंदणीकृत एका कंपनीचे हे खत असल्याचे कृषी विकास अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी माहुली जहांगीर पोलीस ठाण्यात ४ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अमरावती पं.स. चे कृषी अधिकारी उद्धव मयेकर यांच्या तक्रारीवरून माहुली ठाण्यात रासायनिक खते (नियंत्रण) आदेशाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.