नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक / प्रतिनिधी – सोयाबीन, मका पिकानंतर आता येवल्यातील, वडगाव येथे टोमॅटो पिकावर देखील प्लास्टिक व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव पडू लागल्याने टोमॅटो काळे पडून गळ देखील होत असल्याने ,टोमॅटो उत्पादक संकटात सापडला आहे.
येवला तालुक्यातील वडगाव येथील भाऊसाहेब कापसे या शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रामध्ये टोमॅटोचे पीक घेतले होते. मात्र आता या टोमॅटो पिकावर प्लास्टिक व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्याने अक्षरश; हे टोमॅटो झाडावरच पिवळे पडून काळे देखील पडत असल्याने टोमॅटोची गळ देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.
कुठे तरी टोमॅटोला भाव मिळत असताना आता या टोमॅटो पिकावर रोगाचा प्रादुर्भाव जाणू लागल्याने केलेला खर्च देखील निघणे उत्पादक मुश्किल झाले असल्याने परत एकदा टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडताना दिसत आहे.