नेशन न्यूज़ मराठी टिम.
ठाणे/प्रतिनिधी- ठाणे वाहतूक विभागाच्या कार्यक्षेत्रातील कोळसेवाडी वाहतूक उप विभागाच्या हद्दीमध्ये लोढा पलावा जंक्शन येथील देसाई खाडी ब्रिज ते काटई गाव येथे नवीन पूल निर्माण करण्याचे काम सुरू आहे. एक्सपेरिया मॉल समोरील लोढा कॉम्प्लेक्सचे आतमध्ये जाण्याच्या मुख्यद्वारावर कल्याण फाटा कडून कल्याणकडे जाणाऱ्या वाहिनींवर मोठ्या क्रेनच्या साहाय्याने सिमेंट गर्डर ठेवण्याचे काम करावयाचे आहे. त्याकरिता दि. 9 ऑगस्ट 2023 ते दि. 1४ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री 10.०० ते सकाळी ६:०० वाजेपर्यंत या पूलावरील वाहिनी वाहतूकीकरीता बंद करण्यात करुन वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.
वाहतुकीत करण्यात आलेले बदल पुढीलप्रमाणे :-
प्रवेश बंद :- (१) मुंब्रा, कल्याण फाटा कडून कल्याणकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना कल्याण फाटा येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- ही वाहने कल्याण फाटा-मुंब्रा बायपास-खारेगाव टोलनाका मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद :- २) कल्याण कडून कल्याण फाटाकडे जाणाऱ्या सर्व प्रकार जड-अवजड वाहनांना बदलापूर चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- ही वाहने बदलापूर चौक-खोणी नाका-तळोजा एमआयडीसी मार्गे इच्छित स्थळी जातील.
ही वाहतूक अधिसूचना खालील नमूद कालावधी दरम्यान गर्डर टाकण्याचे काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहणार आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.
१) दि. ०९ ऑगस्ट २०१३ रोजी रात्री 10.०० ते दि. 10 ऑगस्ट २०2३ रोजी सकाळी 06.00 वाजे पर्यंत.
२) दि. 10 ऑगस्ट २०१३ रोजी रात्री 10.०० वा. ते दि. 11 ऑगस्ट २०2३ रोजी सकाळी 06.00 वाजे पर्यंत.
३) दि. 11 ऑगस्ट २०१३ रोजी रात्री 10.०० वा. ते दि. 12 ऑगस्ट २०2३ रोजी सकाळी 06.00 वाजे पर्यंत.
४) दि. 12 ऑगस्ट २०१३ रोजी रात्री 10.०० वा. ते दि. 13 ऑगस्ट २०2३ रोजी सकाळी 06.00 वाजे पर्यंत.
५) दि. 13 ऑगस्ट २०१३ रोजी रात्री 10.०० वा. ते दि. 14 ऑगस्ट २०2३ रोजी सकाळी 06.00 वाजे पर्यंत.
६) दि. 14 ऑगस्ट २०१३ रोजी रात्री 10.०० वा. ते दि. 15 ऑगस्ट २०2३ रोजी सकाळी 06.00 वाजे पर्यंत.
ही वाहतूक अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही, असेही ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी कळविले आहे.