नेशन न्यूज मराठी टिम.
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – डोंबिवली मानपाडा पोलिसांनी दोन सराईत चोरट्याना बेड्या ठोकल्या आहेत. युसूफ शेख, नौशाद आलम अशी या दोन्ही सराईत चोरट्याची नावे आहेत. या दोघांविरोधात ठाणे, नवी मुंबई, मुंबई परिसरातील एकूण १८ गुन्ह्यांची उकल झाली आहे. धक्कादायक म्हणजे मुंबईतील एका डान्स बारमधील एका बारबालेवर यूसूफचा जीव जडला होता. आत्तापर्यंत त्याने तिच्यावर ५० लाख रुपयांची उधळण केली.
केवळ तिच्यावर पैसे उधळण्यासाठी यूसूफ त्याचा मित्र नौशादसोबत चोऱ्या करत होता. हे दोघे सराईत गुन्हेगार असून युसूफला याआधी २३ गुन्ह्यात तर नौशादला ११ गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. या दोघांची जेलमध्ये मैत्री झाली होती. पोलिसांनी या दोघांकडून २० तोळे सोन्याचे दागिने, सव्वा दोन लाखांची रोकड, दोन बाईक, २ लॅपटॉप, ८ मोबाईल, पाच महागडी घड्याळ, १ महागडा कॅमेरा, स्क्रू ड्रायव्हर, चाकू, पक्कड हस्तगत केली आहे.