नेशन न्यूज मराठी टीम.
संभाजीनगर/प्रतिनिधी – मणिपूर येथे मैतेई आणि कुकी या दोन समाजांमध्ये गेल्या दोन महिन्यापासून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष आता दंगल, जाळपोळ आणि नरसंहारापर्यंत पोहोचला आहे. यामध्येच कळस म्हणजे मणिपूर राज्यातील कुकी समाजाच्या दोन महिलांना पोलिसांच्या संरक्षणातून बाहेर काढून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला.
या घटनेचा वंचित बहुजन महिला आघाडीकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करण्यात आला आहे. भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी प्रमुख मागणी यावेळी आंदोलक महिलांकडून करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने वंचितचे कार्यकर्ते उपस्थित होते.