नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती/प्रतिनिधी – शेती पिकांचे पंचनामे न झाल्याने अमरावतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शेतातील साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन करण्यात आले. यावेळी हेक्टरी 30 हजार रुपये देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दोन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे चांदुर रेल्वे चांदुर बाजार आणि नांदगाव खंडेश्वर या 4 तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर वरील पिके पाण्याखाली आली आहेत. या दरम्यान अजूनही शेती पिकांचे पंचनामे झाले नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.