नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक/प्रतिनिधी – ठाणे रायगड, पालघर आणि इतर अनेक राज्याच्या जिल्ह्यामध्ये पावसाने मोठा उधम माजवला असला तरी नाशिक जिल्हातील बऱ्याच भागात पावसाने दडी मारल्याचे चित्र दिसत आहे येवला तालुक्यासह नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये जेमतेम अल्प पावसावर शेतकऱ्यानी मका, भुईमूग,बाजरी पीक घेतले आहे. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली असून अक्षरश; पीक हे पाणी पाणी करू लागले असून मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी असल्याचे दिसत आहे.
येवला तालुक्यातील ममदापूर भागात अक्षरश; पाऊस पडत नसल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर घोंगावत असल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.कर्ज काढून रक्ताचे पाणी कार्यून मेहनत केली शेतीची पेरणी केली पण पाऊस नसल्याने दुबार पेरणीचे सकट आले तर पुन्हा कर्जाचा डोंगर डोक्यावर उभा राहील या चिंतेने बळीराजाला ग्रासले आहे.