नेशन न्यूज मराठी टीम.
नवी मुंबई/प्रतिनिधी – भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखा कार्यालय-II च्या अधिकाऱ्यांच्या पथकाने नवी मुंबईतील मेसर्स फ्युचर सेफ्टी ग्लास इंडस्ट्रीज, R-27, TTC औद्योगिक क्षेत्र, रबाळे, MIDC रोड, नवी मुंबई – 400701, या कारखान्यावर 06.07.2023 रोजी अंमलबजावणी छापा टाकला. या कंपनीवर 08.05.2023 रोजी केलेल्या शोध आणि जप्ती कारवाई अंतर्गत तेथील वस्तू जप्त केल्यानंतर देखील या कंपनीने प्रमाणीकरणाशिवाय स्थापत्य, इमारत आणि इतर सामान्य हेतूंसाठी वापरल्या जाणार्या सुरक्षा काचेचा एक प्रकार असलेल्या टफन ग्लासचे उत्पादन करणे सुरु ठेवल्याचे या छाप्यात उघडकीला आल्याचे शास्त्रज्ञ-एफ आणि प्रमुख, बी आय एस MUBO-II, संजय विज यांनी सांगितले. सुरक्षा काच (गुणवत्ता नियंत्रण) आदेश, 2022 (QCO) नुसार सर्व सुरक्षा काच IS 2553 नुसार बी आय एस प्रमाणित असतील आणि त्यावर वैध बी आय एस परवाना क्रमांकासह BIS मानक चिन्ह असणे बंधनकारक आहे.
या छाप्यादरम्यान कंपनीत आढळलेली सुरक्षा काच, बी आय एस प्रमाणित नव्हती जे सुरक्षा काच (गुणवत्ता नियंत्रण) आदेश, 2022 (QCO) चे उल्लंघन आहे. छाप्यादरम्यान अंदाजे 517 स्क्वेअर मीटर सामग्री सापडली असून त्यामुळे ही कंपनी सर्रास बी आय एस प्रमाणपत्राशिवाय टफन ग्लास अर्थात सुरक्षा काचेचे उत्पादन करत असल्याचे स्पष्ट होते, जे बी आय एस कायदा 2016 च्या कलम 17(1) चे उल्लंघन आहे.
सुरक्षा काच (गुणवत्ता नियंत्रण) आदेशाचे उल्लंघन केल्यास बी आय एस कायदा 2016 नुसार दोन वर्षांपर्यंत कारावास आणि किमान 2,00,000 रुपयांचा दंड किंवा दोन्ही होऊ शकते.
म्हणून, बी आय एस सर्व ग्राहकांना बी आय एस ने प्रमाणित केलेल्या अनिवार्य उत्पादनांची यादी शोधण्यासाठी BIS CARE ॲप (मोबाइल Android + IOS दोन्हीमध्ये उपलब्ध) वापरण्याचे आवाहन करते. तसेच उत्पादन खरेदी करण्यापूर्वी बीआयएस ची वेबसाईट http://www.bis.gov.in ला भेट देऊन वस्तूवरील आय एस आय मार्कची सत्यता तपासण्याची विनंती करते. याशिवाय जर एखादे वेळी नागरिकांना अनिवार्य उत्पादनांची विक्री बी आय एस प्रामाणिकरणाशिवाय होताना आढळल्यास त्यांनी त्वरित, हेड, MUBO-II, पश्चिम प्रादेशिक कार्यालय, बी आय एस , 5वा मजला, CETTM, MTNL टेक्नॉलॉजी स्ट्रीट, हिरानंदानी गार्डन, पवई, मुंबई – 400076 (डॉ. एल एच हिरानंदानी हॉस्पिटल जवळ) या पत्त्यावर संपर्क साधावा अशी विनंती करण्यात येत आहे. याशिवाय hmubo2@bis.gov.in या पत्त्यावर ई-मेलद्वारेही अशा तक्रारी करता येतील. अशा माहितीचा स्रोत गोपनीय ठेवला जाईल.