महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

नाशिकचे हाजी मोहम्मद अली करणार पायी हज यात्रा

नेशन न्यूज मराठी टीम.

नाशिक/प्रतिनिधी – मुस्लिम धर्मीयांमध्ये हज यात्रा करणे अत्यंत पवित्र धार्मिक स्थळ मानले जाते. दरवर्षी संपूर्ण देशातून हज यात्रेला मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव हे जात असतात. मोठी श्रद्धा या धार्मिक स्थळाबाबत संपूर्ण जगातील मुस्लिम बांधवांची आहे. यातच नाशिक मधून एक मुस्लिम बांधव हा या हज यात्रेला पायी निघाले आहे. नाशिकच्या वडाळा रोड आयाशा मस्जिद परिसरात राहणारे हाजी मोहम्मद अली हे नाशिकमधून हजकडे रवाना झाले आहेत. शहरातील प्रसिद्ध अशा बडी दर्गा शरीफ येथे त्यांनी दर्शन घेऊन ते पुढे आपल्या हज प्रवासाला रवाना झाले आहेत.

यावेळी बडी दर्गा येथे शहरे खतीब यांनी दुवा पठण केली. नाशिक गुजरात, राजस्थान, दिल्ली आणि दिल्ली येथून विमानाने इराण येथे प्रवास करून पुन्हा इराण वरुन पायी इराक आणि सौदी अरेबिया येथे मक्का मदिना असा ते पायी प्रवास करणार आहेत. पुढील वर्षी 3 जून 2024 रोजी ते सौदी अरेबिया येथे पोहोचतील आणि आपला हा 7 हजार 216 किलोमीटर पायी प्रवास पूर्ण करणार आहेत. भारतातून हज पायी प्रवास करणारे ते तिसरे व्यक्ती आहेत. सण 2003 पासून ते या यात्रेसाठी प्रयत्न करत होते. मात्र काही अडचणींमुळे त्यांच्या या प्रवासात अडथळे आले होते. अखेर त्यांच्या या प्रवासाला आज 3 जुलै 2023 पासून सुरुवात होत आहे. या प्रवसातील देश विदेशातील सर्व कायदेशीर प्रक्रिया देखील त्यांनी पूर्ण केल्या आहेत. यावेळी त्यांच्या परिवार वाल्यांकडून आणि मुस्लिम बांधवांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×