नेशन न्यूज मराठी टीम.
सातारा/प्रतिनिधी – कालच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षातील काही आमदारांना घेऊन भाजप शिवसेनेचे हात मिळवणी करत सत्तेमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरच पक्षांमध्ये उभी फूट पडली आहे. अशी चर्चा राज्यभर सुरू असतानाच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षाला नवी उभारी देण्यासाठी गुरुपौर्णिमेचा मुहूर्त निवडत साताऱ्यातील कराड येथे असलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आपल्या पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे.
त्यांनी साताऱ्यात आल्यानंतर माध्यमांशी बोलताना पक्षावर आलेल्या अनेक अडचणींवर मला माफ करण्याचे बळ हे नेहमीच साताऱ्याने दिला आहे त्यामुळे मी माझ्या पक्षाची नवी उभारणी ची सुरुवात साताऱ्यातून करत असल्या ची घोषणा देखील त्यांनी या वेळेला बोलताना केली आहे.
सातारने मला नेहमीच बळ दिले म्हणून अपयश आलं तरी मी साताऱ्यातून सुरुवात करतो आणि यशाची सुरुवात जरी करायची असली तरी मी साताऱ्यातूनच करतो. असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात बोलताना व्यक्त केले आहे.