महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

डोंबिवलीत सिम कार्ड फ्रॉड प्रकरणी महिलालेला अटक

नेशन न्यूज मराठी टीम.

डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवली स्टेशन परिसरात दुकानाचे अधिकृत कोड वापरत रस्त्यावर सिम कार्डचे स्टॉल लावून सिम कार्ड घेणाऱ्या ग्राहकांच्या आधारकार्डवर वेगवेगळे फोटो वापरुन बनावट आधारकार्ड तयार करत त्या बनावट आधारकार्डच्या आधारे नवीन सिम कार्ड अॅक्टिव्ह करत गुन्हेगारीसाठी जास्त पैशात त्याची विक्री करणारा प्रकार सुरू होता.

डोंबिवलीत एसीपी सुनील कुराडे यांच्या टीमने छापा मारत स्टॉलवर ग्राहकांच्या दस्तावेची हेराफेरी करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले. आतापर्यंत या महिलेने 170 ग्राहकांच्या नावाने सिम कार्ड काढून बाजारात विकले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली असून स्टेशन परिसर किंवा अनधिकृत दुकानांवर सिम कार्ड घेतल्यास तुमच्या दस्तावेजचा वापर करून कोणीही काही क्राईम केल्यास तुम्हालाच तुरुंगवास भोगावा लागेल त्यामुळे अधिकृत दुकानातून सिमकार्ड घेण्याचे आवाहन पोलीस करत आहेत.

सिम कार्ड घोटाळ्याची एक धक्कादायक घटना डोंबिवलीत स्टेशन परिसरात उघडकीस आली आहे. डोंबिवलीत स्टेशन परिसरात दुकानाचे अधिकृत कोड वापरत रस्त्यावर सिम कार्डचे स्टॉल लावून सिम कार्ड घेणाऱ्या ग्राहकांच्या कागदपत्रांचा गैरवापर करत सिम कार्डची विक्री होत असल्याची माहिती डोंबिवलीचे एसीपी सुनील कुराडे यांना मिळाली होती. त्यानुसार डोंबिवली एसीपी सुनील कुराडे व मालपाणी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी मिळून स्टेशन परिसरात छापा टाकत आरोपी महिलेला ताब्यात घेतले.

महिलेची अधिक चौकशी केली असता ही महिला डोंबिवली पूर्वेतील गणेश इलेक्ट्रिक शॉपचे डीलर कोड वापरून स्टेशन परिसरात वोडाफोन-आयडियाचे सिमकार्ड वितरीत करण्याचा स्टोल लावून सिम कार्ड घेणाऱ्या ग्राहकांच्या आधारकार्डवर वेगवेगळे फोटो लावून बनावट आधारकार्ड तयार करत, त्या बनावट आधारकार्डच्या आधारे नवीन सिम कार्ड अॅक्टिव्ह करत ते सिमकार्ड जास्त पैशात विक्री करत होती.

हे सिमकार्ड ऑनलाइन फसवणूक धमकी व सोशल मीडियावर विविध क्राईम करण्यासाठी वापरल जात असे, सध्या डोंबिवली पोलिसांनी या महिलेला बेड्या ठोकत या महिलेकडून 170 जणांच्या नावाने सिम कार्ड काढल्याची माहिती उघडकीस आली असून अजून हिने किती लोकांना सिमकार्ड विकले? याची माहिती पोलीस घेत आहेत. तर टेलीकम्युनिकेशन गवर्नमेंट ऑफ़ इंडिया यांच्या कडून चुकीच्या पद्धतीने सिम कार्ड वापरण्याची यादी पाठवण्यात आली असून या यादीनुसार राज्यात सर्व ठिकाणी छापेमारी सुरू असून ग्राहकांनी स्टेशन परिसर किंवा अनधिकृत दुकानावर सिमकार्ड घेऊ नये तुमच्या दस्तावेजचा वापर करून तुमच्या नावावर दुसरे सिम कार्ड काढून त्यावर कुठल्याही प्रकारचे क्राईम झाल्यास तुम्हालाच तुरुंगवास भोगावा लागेल त्यामुळे अधिकृत विक्रेत्याकडूनच सिमकार्ड घ्यावे असे आवाहन डोंबिवली पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×