नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – राज्यातील विविध सहकारी गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या इमारतींवर रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविल्याने सोसायटीच्या वीजबिलात मोठी कपात झाली आहे. राज्यात ३,०२६ हाऊसिंग सोसायट्यांनी ५२ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता गाठली असून अधिकाधिक संस्थांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवावेत, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले.
सिंघल म्हणाले की, रूफ टॉप सोलरमुळे सोसायटीच्या छतावर निर्माण झालेली वीज सोसायटीतील लिफ्ट, पाण्याचे पंप तसेच इमारतीतील जिने व पार्किंग येथील सार्वजनिक दिवे इत्यादी कामांसाठी वापरली जाते. सोसायटीच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पामध्ये गरजेपेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणला दिली जाते व त्याची नोंद नेट मिटरिंगद्वारे ठेवली जाते. सौर ऊर्जा निर्मितीपेक्षा जर अधिक विजेची गरज पडली तर ती महावितरणकडून घेतली जाते. महावितरणला सोसायटीकडून मिळणाऱ्या विजेच्या बदल्यात सोसायटीच्या वीजबिलात कपात होते.
ते म्हणाले की, ठाण्यातील एका गृहनिर्माण संस्थेने ९० किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प बसविल्यानंतर त्यांचे दीड लाखाचे वीजबिल ७१ हजारांवर आले. ठाण्यातीलच आणखी एका हाऊसिंग सोसायटीने ८० किलो वॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प बसविल्यानंतर त्यांचे विजेचे बिल १ लाख ४८ हजारांवरून ६६ हजारांवर आले. भांडूपच्या एका गृहनिर्माण संस्थेने ४० किलो वॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प बसविल्यानंतर त्यांचे १ लाख २० हजार रुपयांचे वीजबिल ३८ हजारांवर आले.
हाऊसिंग सोसायट्यांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी महावितरण मदत करते. महावितरणच्या www.mahadiscom.in/ismart या संकेतस्थळावर याची संपूर्ण माहिती देण्यात असून ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा आहे. गृहनिर्माण संस्थांना ५०० किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी २० टक्के अनुदान मिळते. सौर ऊर्जानिर्मितीसाठी वापरलेले पॅनेल्स, वायर्सची गरज, पॅनेल्स बसविण्याच्या स्थानाची स्थिती इत्यादीनुसार खर्चात फरक पडतो. नोंदणी असलेल्या एजन्सीमार्फत प्रकल्प बसविले जातात. महावितरण प्रकल्पाच्या मंजुरीपासून तपासणी व अंतिम मंजुरीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर मदत करते, अशी माहिती त्यांनी दिली.
Related Posts
-
रिझर्व बँकेकडून रेपो दरात कपात
प्रतिनिधी मुंबई-जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे त्याचा परिणाम संपूर्ण क्षेत्रात…
-
चोपड्यात शेतकऱ्यांची बैल जोडी विकत घेण्यासाठी मोठी गर्दी
NATION NEWS MARATHI DIGITAL. जळगाव/प्रतिनिधी - पावसाळा जवळ आल्याने शेतकरी…
-
कल्याण डोंबिवलीमध्ये विकास हरवल्यासारखा दिसतोय -गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/7zNXrCfrVAc कल्याण - आगामी केडीएमसी निवडणुकीच्या…
-
डीआरआयची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर ३५ कोटीचे हेरॉईन जप्त
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी - नैरोबीहून मुंबईला आज 11…
-
महाविकास आघाडी सरकारनेही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात करण्याची भाजपाची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - केंद्र सरकारने पेट्रोल - डिझेल उत्पादन कर कमी…
-
महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण महामंडळाची मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक
मुंबई/प्रतिनिधी - पोलीस दलासाठी सुसज्ज पोलीस स्टेशन, सर्व सोयी सुविधा…
-
मुंबईतील एसी लोकलच्या तिकीट दरात जवळपास ५० टक्के कपात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबईतील भायखळा रेल्वे स्थानक,…
-
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सुरक्षेत कपात केल्याने मुंबई येथे निदर्शने
मुंबई - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सुरक्षेत…
-
मोठी ऑफर आली तरी मी तिला हुरळून जाणार नाही - राजू शेट्टी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. परभणी/प्रतिनिधी -सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे…
-
भारतीय तटरक्षक दलाची मोठी कामगिरी,नऊ मच्छिमारांचे वाचवले प्राण
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय तटरक्षक दलाने…
-
झोपड्या वाचविण्याचा लढा माझा आहे- गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - रेल्वेने घरं रिकामी करण्याच्या…
-
शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन दोन टप्यात देणार,कुणाच्याही वेतनात कपात नाही.
प्रतिनिधी. मुंबई- कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यासमोरील आव्हाने लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी…
-
आसाम रायफल्सची मोठी कामगिरी,शस्त्रासह दारूगोळ्याचा मोठा साठा केला जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - गुप्तचर विभागाकडून…
-
एनएनएमटीच्या बसला आग, नागरिक आणि चालक,वाहकाच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणहून नवी मुंबईच्या दिशेने…
-
मुंबई पोलिसाची मोठी कारवाई सेक्स रँकेचा परदा फाश
मुंबई,१८जानेवारी: मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने गुरुवारी रात्री उशीरा आणखी एक…
-
मुंबईत डीआरआयची मोठी कारवाई, ७ किलोपेक्षा जास्त कोकेन केले जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या…
-
म्हाडा वसाहतीच्या गृहनिर्माण संस्थांना सेवाशुल्कावर सूट देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार – मुख्यमंत्री
प्रतिनिधी. मुंबई - म्हाडा वसाहतीच्या 56 गृहनिर्माण संस्थांना म्हाडाकडून वाढीव…
-
मुंबई उपनगरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अकृषिक करास तात्पुरती स्थगिती – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई उपनगरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या…
-
गृहनिर्माण संस्थांसाठी १ ते १५ जानेवारी २०२१ पर्यंत डीम्ड कन्व्हेअन्स विशेष मोहीम
संघर्ष गांगुर्डे मुंबई - राज्यातील गृहनिर्माण संस्थांची संख्या विचारात घेता…
-
पुण्यात जीएसटी विभागाची मोठी कारवाई, ६३० कोटींच्या बनावट पावत्यांद्वारे करचोरी करणाऱ्यास बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्याच्या वस्तू व सेवाकर विभागाने…
-
डोमेसाईल दाखल्यावरील INDIA व Citizen of india ही अक्षरे मोठी व गडद करण्याची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - सेतू मधून देण्यात येणार्या डोमेसाईल दाखल्यावरील INDIA…
-
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे, टाकाऊ वस्तूंपासून खेळण्यांची रचना करण्याच्या ‘स्वच्छ टॉयकॅथॉन’ स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - खेळण्यांसाठीच्या राष्ट्रीय कृती…
-
कामगारांचे नियमबाह्य वेतन कपात करणाऱ्या कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करा – राज्यमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश
अमरावती/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत कामगारांचे…