नेशन न्यूज मराठी टीम.
पालघर/प्रतिनिधी – विक्रमगड तालुक्यातील विक्रमगड हायस्कूल येथे शिक्षण घेत असणाऱ्या व जिजाऊ संस्थेच्या अंध व मतिमंद मुलांची निवासी शाळा झडपोली या शाळेतील विध्यार्थींनी आपल्या कौशल्य गुणांनी राष्ट्रीय स्तरावर बाजी मारली आहे.जिजाऊ संस्थेच्या मोफत चालवण्यात येत असलेल्या अंध व मतीमंद मुलांच्या वसती गृहात राहणाऱ्या अल्प दृष्टीबाधित विद्यार्थींनी असलेल्या आशा अंतराम सुतार, वैशाली काळू नडगे, माधुरी विष्णू भोये व विठा कृष्णा वाजे या ४ विद्यार्थींनीनी तालुका स्तरापासून ते राष्ट्रिय स्तरापर्यंत आपल्या कौशल्य गुणांनी बाजी मारून जिजाऊ संस्थेचे , विक्रमगड हायस्कूलचे आणि पालघर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
दि.४ मे ते ८ मे २०२३ या कलावधीत प्रादेशिक विद्या प्राधिकरण राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था नागपुर महाराष्ट्र शासातर्फे ऑनलाइन पन्नासावे राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये वाहतूक व नवउपक्रम या विषयाच्या आधारावर या विद्यार्थींनी हायड्रॉलिक पुल प्रोजेक्ट तयार केला होता आणि त्या प्रोजेक्टचे उत्कृष्ट सादरीकरण करुन दिव्यांग प्रवर्गामधून त्यांची राष्ट्रिय स्तरावर निवड करण्यात आली आहे.
या मिळविलेल्या यशाबद्दल या विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी केले आहे. तर या बाबत जिजाऊ अंध व मतिमंद शाळेतील शिक्षक चंद्रकांत भोये यांनी या विद्यार्थीनीना योग्य असे मार्गदर्शन केले होते. या शाळेचे मुख्याध्यापक महेश गायकवाड व सर्व शिक्षक तसेच विक्रमगड हायस्कूल विक्रमगड येथील मुख्याध्यापक घोलप व सर्व शिक्षक यांचे देखील विशेष सहकार्य लाभले. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या अंध व मतिमंद मुलांची निवासी शाळा झडपोली या शाळेत सध्या १०० च्या वर मुल-मुली निवासी शिक्षण घेत आहेत . संस्थेच्या वतीने त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन आणि सर्वोतोपरी सहकार्य केले जाते . या विद्यार्थ्यांचे सध्या सर्वच स्तरांतून कौतुक केले जात आहे.