नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/अशोक कांबळे – पाचव्या माळ्यावरून लिफ्टचा डकमध्ये पडून तेरा वर्षे मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कल्याण पश्चिम परिसरात घडली, बुधवारी रात्रीच्या सुमारास कल्याण पश्चिम गांधारे येथील रिद्धी सिद्धी सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे,
कल्याण पश्चिमेकडील गांधारी परिसरात रिद्धी सिद्धी सोसायटी इमारतीच्या समोर कनोजिया कुटुंब राहते. कनोजीया यांचा लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास कनोजे यांचा १३ वर्षाचा मुलगा सुधांशू हा रिद्धी सिद्धी सोसायटीमध्ये दोन जणांना कपडे देण्यासाठी गेला. त्याने चौथ्या माळ्यावर कपडे दिले, त्यानंतर तो सहाव्या मळ्यावर कपडे देण्यास गेला,
कपडे देवून परतत असताना पाचव्या माळ्यावरून तो लिफ्ट मध्ये जाण्याचा प्रयत्न करत असताना तो पाचव्या माळ्यावरून लिफ्टच्या डकमध्ये पडला, या दुर्घटने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, खडकपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे,