नेशन न्यूज मराठी टीम.
भिवंडी/प्रतिनिधी – भिवंडी येथील वलपाडा परिसरातील एक इमारत अचानक कोसळली. यात इमारतीच्या ढिगार्याखाली ५० हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे. वल ग्रामपंचायतीच्या हद्दीत वर्धमान नावाची तीन मजली इमारत होती. त्या इमारतीच्या तळ मजल्यावर एक गोडाऊन होते. त्या गोदामात ३० हून अधिक लोक काम करत होते.
तर वरील सर्व मजल्यावर सर्व कुटुंब राहत होती. ही इमारत कोसळ्याने यात ५० ते ६० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या घटनास्थळी प्रशासनाने धाव घेतली आहे. भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथील ढिगारा हटविण्यास सुरुवात केलली आहे. दरम्यान, एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. आतापर्यंत इमारतीत अडकलेल्या एकाही व्यक्तीला बाहेर काढण्यात यश आलेले नाही. त्यामुळे जिवीतहानीची भीती व्यक्त करण्यात येत आहे.