नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – गेल्या काही दिवसांपासून मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या पर्स चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रेल्वे पोलीस या प्रकरणात तपास करीत होते. त्याचबरोबर कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच या प्रकरणाचा तपास करीत होती.अखेर चार आरोपींना मोठ्या शिताफीने मुसक्या आवळल्या आहेत.
मेल एक्सप्रेसमध्ये महिला प्रवाशांच्या पर्स चोरणाऱ्या एका टोळीला कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गणेश राठोड, प्रकाश नागरगोजे, तानाजी शिंदे आणि रवी गायकवाड या आरोपींची नावे आहेत. धक्कादायक म्हणजे गाडी रेल्वे स्टेशनला थांबताच हे चोरटे गाडीत चढायचे. गाडी सिग्नलला थांबल्यावर महिलांच्या पर्स हिसकावून पळ काढायचे. गेल्या काही महिन्यांपासून कर्जत ते डोंबिवली दरम्यान मेल एक्सप्रेसमध्ये ते चोरी करत होते. या आरोपींकडून जवळपास साडे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.गेल्या काही दिवसांपासून मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या पर्स चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
रेल्वे पोलीस या प्रकरणात तपास करीत होते. त्याचबरोबर कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच या प्रकरणाचा तपास करीत होती. रेल्वे पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांच्या सुचनेनुसार चोरट्यांना लवकर अटक करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे पोलीस सापळा रचून सावज शोधत होते.
कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अरशद शेख याच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु करण्यात आला. पोलीस कर्मचारी वैभव जाधव, अजित माने, रवी ठाकूर आणि अक्षय चव्हाण या पथकाने रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली.
कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फूटेज पोलीस तपासत असताना त्यावेळी एक संशयित तरुण आढळून आला. या तरुणाचं नाव रवी गायकवाड असं आहे. या तरुणाची चौकशी केली असता त्याने जी माहिती दिली ती धक्कादायक होती. रवी त्याचे साथीदार गणेश राठोड, प्रकाश नागरगोजे, तानाजी शिंदे यांच्यासोबत महिला प्रवाशांच्या पर्स चोरी करायचे. गाडी रेल्वे स्थानकात थांबल्यावर ते गाडीत बसायचे. एखाद्या सिग्नलाला गाडी थांबणार हे कळताच पर्स हिसकावून पसार व्हायचे. या चौघांच्या विरोधात याआधीही गुन्हे दाखल झाले आहेत. यामधील तीन जण हे पुण्यात राहणारे आहेत. पोलिसांनी यांच्याकडून जवळपास साडे नऊ लाखाचे चोरलेले दागिने हस्तगत केले आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.