नेशन न्यूज मराठी टिम.
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – दारू पिवून हौस मौज करण्यासाठी रिक्षा चालक व गॅरेज मेकॅनिक या दोघांनी चोरीचे पाऊल उचलल्याचे डोंबिवली समोर आलेय.. डोंबिवली ठाकुर्ली परिसरात एक रिक्षा चोरी करताना हे दोघं सीसीटीव्ही कॅमेरात काही झाले. डोंबिवली रामनगर पोलिसांनी या दोघांचा भांडाफोड करत त्यांना बेड्या ठोकल्यात.श्रीकांत शेंडगे व विक्रम साळुंखे असे या दोन्ही चोरट्यांची नावे असून पोलिस त्यांच्याकडून चोरी केलेली एक रिक्षा व एक बाईक हस्तगत केली आहे.त्यांनी आणखी काही वाहनं चोरी केली असावीत असा संशय पोलिसांना असून पोलीस पुढील तपास करत आहेत .
काही दिवसांपूर्वी ठाकुर्ली चोळेगाव परिसरात रिक्षा चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता .पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटिव्ही फूटेजच्या सहाय्याने या गुन्ह्याचा तपास सुरू केला.एका सीसीटीव्ही कॅमेरात ही रिक्षा चोरून घेऊन जाताना दोन चोरटे पोलिसांना दिसून आले.यासाठी सीसीटिव्हीच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला. हे दोन्ही चोरटे कल्याण पिसवली परिसरात चोरी केलेल्या रिक्षाचे ऑटो पार्ट विक्री करत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही चोरट्यांना अटक केली. श्रीकांत शेडगे, विक्रम साळुंखे असे चोरट्यांचे नाव असून श्रीकांत मेकॅनिक आहे तरी विक्रम हा रिक्षा चालक आहे या दोघांना दारूचे व्यसन जडले होते दारू पिऊन हौस मौज करण्यासाठी या दोघांनी चोरी करणे सुरू केल्याची माहिती तसेच समोर आली. या दोघांनी याधी देखील अशा प्रकारे चोऱ्या केल्या असल्याचा संशय पोलिसांना असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत