नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – इंदू मिल येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.. याबाबत बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी १२ वर्ष झाली आजही कामं पूर्णत्वास जात नाही.. भाजपचे सरकार केंद्रात आलं नरेंद्र मोदी यांनी मुंबईत आले भुमिपुजन केलं.यावेळी मुंबई शहर हे भारताच्या आर्थिक राजधानी आहे जशी अमेरिकेचे आर्थिक राजधानी न्यूयॉर्क येथे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच पार्श्वभूमीवर स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी नावाने जगप्रसिद्ध बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळा व्हावा अशी सूचना केली .त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी गुजरातला गेले त्यानंतर तिथे घोषणा केली आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा मोठं स्मारक त्यानंतर उभं सुद्धा सुद्धा राहिलं त्याला दोन-तीन वर्ष होत आहेत तरी बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारकाचे कामकाज सुरू आहे . त्यामुळे ही दिरंगाई आहे. याबद्दल प्रश्न नाही हे काम पूर्ण व्हायला अडीच ते तीन वर्ष जातील परंतु सरकारचे म्हणणे एका वर्षात करणार बघू किती सत्यात उतरते असे सांगितले
राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिल्लीत अमित शहा यांचे भेट घेतल्याचं वृत्तसमोर आलंय.. या भेटीच्या वृत्तानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले याबाबत बोलताना रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला लगावलाय.आनंदराज आंबेडकर यांनी देशात सुरू असलेलं राजकारण आपण सगळे पाहतोय ..इडी ,सीबीआय, एन आय याचा स्वछंद पद्धतीने वापर केला जातोय.. त्यामुळे सत्तेत किंवा सत्तेच्या पूर्वी सत्तेत असणारे हे सगळे या देशातल्या सरकारला घाबरत आहेत. जो विहीर सांभाळतो पाणी चाखतो अशा पद्धतीने पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांचे झालंय.. त्यामुळे ते सर्वजण घाबरून आहेत त्यामुळे अशा पद्धतीने आपल्या स्वतःला वाचवण्याचे काम आता सध्या चालू असल्याचा टोला रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी राष्ट्रवादिसह भाजप नेत्यांना लगावला . आनंदराज आंबेडकर घा आज कल्याण मध्ये एक कार्यक्रम निमित्त आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
तर गेल्या काही दिवसांपासून भाजप राष्ट्रवादी मधील जवळीक वाढत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात अजित पवार देखील मुख्यमंत्री होऊ शकतात असे चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीये याबाबत बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी हे काळच ठरवेल.निवडणूक आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय कधी होईल यावर हे सगळं अवलंबून आहे त्यात सुप्रीम कोर्टाचा निर्णय अत्यंत महत्वपूर्ण आहे .सध्याचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया या पद्धतीने विदाऊट प्रेशर काम करतायत त्यामुळे महाराष्ट्रातल्या असणाऱ्या भाजपा सरकारला कुठेतरी भीती वाटायला लागलीये त्यामुळे नव्याने जुळणी करण्याचा प्रयत्न चालू आहे असं मला वाटतं असे सांगितले