महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
लोकप्रिय बातम्या शिक्षण

आरटीई अंतर्गत कोट्यातील प्रवेश अर्जभरण्यास २५ मार्च पर्यंत मुदतवाढ

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे/प्रतिनिधी – बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमाद्वारे जिल्ह्यातील कायम विनाअनुदानित / विनाअनुदानित व स्वयंअर्थसहायित शाळांमध्ये सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता पहिलीतील आरटीई अंतर्गत 25 टक्के कोट्यातील प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया सुरू असून अर्ज भरण्याची मुदत 25 मार्च पर्यंत वाढविण्यात आली आहे. पालकांनी https://rte25admission.maharashtra.gov.in/…/Users/rteindex या संकेतस्थळावर अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले आहे. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता शिक्षण हक्क अधिनियम (आरटीई) अंतर्गत 25% कोट्यातील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महानगरपालिका मध्ये एकूण 629 पात्र शाळा असून एकूण १२२७८ रिक्त जागा उपलब्ध आहेत.

आरटीई 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी पालकांसाठी मदत केंद्रांची यादी, ऑनलाईनप्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका, आवश्यक कागदपत्रे इत्यादीबाबत सर्व माहिती शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी अद्यापपर्यंत ज्या बालकांची अर्ज नोंदणी अपूर्ण आहेत. अशा बालकांचे अर्ज पूर्ण करण्यासाठीमहाराष्ट्रशासनाकडूनhttps://rte25admission.maharashtra.gov.in/…/Users/rteinde या संकेतस्थळावर 25 मार्च २०२३ रात्री १२.०० वाजेपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या जास्तीत जास्त बालकांच्या अर्जांची नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कारेकर यांनी केले आहे.

पात्र शाळा व बालक पात्र शाळा :- विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थ सहाय्यित शाळा (अल्पसंख्याक शाळा वगळून) पात्र बालक :- 1) वंचित घटक – अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विशेष मागास प्रवर्ग (SBC), विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब-क-ड) (NT), इतर मागासवर्ग प्रवर्ग (OBC), 2) दुर्बल घटक – एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले घटक. 3) दिव्यांग बालके – 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असलेले बालके. 4) अनाथ बालक, 5) कोव्हीड प्रभावित बालक (ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोव्हीड प्रादुर्भावामुळे झाले आहे.). 6) एच. आय. व्ही. बाधित किंवा एस. आय. व्ही. प्रभावित बालक.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×