महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image कला/साहित्य लोकप्रिय बातम्या

मराठीसाठी ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – अतिशय प्रतिष्ठित समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेसाठी ‘उजव्या सोंड्यांच्या बाहुल्या’ या कादंबरीला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कादंबरीचे लेखक प्रवीण बांदेकर यांनी स्वीकारला.

येथील कमानी सभागृहात आज साहित्य अकादमी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या पुरस्कार अर्पण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे नामवंत साहित्यिक उपमन्यु चटर्जी, साहित्य अकादमीचे नवनियुक्त अध्यक्ष माधव कौशिक तसेच नवनियुक्त उपाध्यक्ष कुमुद शर्मा आणि सचिव के. श्रीनिवास राव यांच्यासह 24 भाषेतील पुरस्कारार्थी साहित्यिक व्यासपीठावर उपस्थित होते.

मराठी भाषेसाठी ‘उजव्या सोंड्याच्या बाहुल्या’ या प्रायोगिक कादंबरीला वर्ष 2022 चा मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोंकणी भाषेसाठी माया खरंगटे यांना त्यांच्या कोकणी भाषेतील ‘अमृतवेळ’ या कादंबरीसाठी प्रदान करण्यात आला.‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ ही एक प्रायोगिक कादंबरी आहे. या कादंबरीत समकालीन संस्कृतीवरच्या संकटाचे नाट्यमय चित्रण केलेले आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण भागात लोकप्रिय असलेल्या चित्रकथीसारख्या लोककला प्रकारांचा उत्कृष्ट वापर केल्याने कादंबरीचे कथन तंत्र नाविन्यपूर्ण झालेले आहे. कादंबरीत अधूनमधून कोकणी आणि गोव्यातील बोलींच्या कलात्मक वापराने कादंबरीची कथनशैली समृद्ध झाली आहे. स्वतःची ओळख हरवून बसलेल्या विचारवंतांच्या नोस्टॅल्जीयाचे चित्रणअतिशय संवेदनशीलतेने केलेले आहे. या सर्व कथनामुळे ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ ही मराठी साहित्यकृती विशेष ठरली आहे.

मराठीतील सुप्रसिद्ध लेखक प्रवीण बांदेकर कवी-समीक्षक आहेत त्यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झालेला आहे. त्यांनी इंग्रजी व मराठी साहित्य निर्मिती केली आहे. ते सावंतवाडी येथील शासकीय कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांच्या येरू म्हणे, चाळेगत, इंडियन ॲनिमल फार्म, चिनभिन असे साहित्य प्रकाशित झालेले आहे. श्री. बांदेकर यांना महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार, जैन फाउंडेशनचा ना. धों. महानोर पुरस्कार इत्यादी अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×