नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय,कल्याण डोंबिवली महानगपालिका,डोंबिवली विभागात असलेल्या गैरसोयीच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार सागर डबरासे (महाराष्ट्र राज्य अध्यक्ष), किरण घोंगडे (महाराष्ट्र राज्य युवा प्रमुख) यांच्या सूचनेनुसार संबंधित पत्रक कल्याण डोंबिवली महानगपालिकेचे उपायुक्त सुधाकर जगताप यांना देण्यात आले होते.
पत्रकाची तत्काळ दखल घेत प्रशासनातील आयुक्त, उपायुक्त यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी यांना मागण्या पूर्ण करण्याचे तत्काळ लेखी निर्देश दिले.या आशयाचे लेखी पत्रक मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल, डॉ. सावकारे यांनी रिपब्लिकन सेनेचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष (पँथर)आनंद नवसागरे तसेच महिला आघाडीच्या सुवर्णा कांबळे शिष्टमंडळाला दिले. आश्वासन दिले असले तरी कामात दिरंगाई झाल्यास रिपब्लिकन सेना, रिपब्लिकन युवा सेनेतर्फे येत्या काही दिवसात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे नवसागरे यांनी सांगितले.