महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ताज्या घडामोडी देश

‘राष्ट्रीय युवा संसद’ स्पर्धेसाठी श्रद्धा शिरोडकरची निवड

नेशन न्युज मराठी टिम.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2023 अंतर्गत महाराष्ट्र व गोवा राज्य नेहरू युवा केंद्र संघटन आणि गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सतर्फे पुण्यात आयोजित गोवा-महाराष्ट्र राज्यस्तरीय युवा संसद स्पर्धेत दक्षिण गोव्याच्या  श्रद्धा शिरोडकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला. नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेसाठी  गोवा राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी  तिची निवड झाली आहे. 

या अगोदर नेहरू युवा केंद्रातर्फे गोव्यात घेण्यात आलेल्या उत्तर- दक्षिण जिल्हा स्तरीय युवा संसद स्पर्धेत दक्षिण गोव्यातून श्रध्दा शिरोडकरने  प्रथम क्रमांक पटकावला होता. तसेच नेहरू युवा केंद्र दक्षिण गोवा तर्फे राजीव कला मंदीर फोंडा याथे आयोजीत युवा उत्सव भाषण स्पर्धेतही ती प्रथम आली होती.

पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट युजीसी इमारतीच्या सभागृहात ऑनलाइन पध्दतीने राज्यस्तरीय युवा संसद स्पर्धा शनिवारी (४ फेब्रुवारी) घेण्यात आली.  यावेळी राष्ट्रीय सेवा योजना (महाराष्ट्र आणि गोवा)चे प्रादेशिक संचालक डी. कार्थिग्वेन, एनवायकेएसचे राज्य संचालक प्रकाशकुमार मनुरे व आणि गोखले इन्स्टिट्यूटच्या प्रा. डॉ. हेमांगी मोरे आदि मान्यवर उपस्थित होते.

गोवा, महाराष्ट्रासह 33 जिल्ह्यातील 68 युवक-युवतींनी स्पर्धेत भाग घेतला. जलवायू पर्यावरण, औद्योगिक विकास 4.0  आणि महिला सुरक्षा या विषयांवर मुलामुलींनी त्यांची मते मांडली. मुख्यपरीक्षक म्हणून ज्येष्ठ पत्रकार अमिन खान, डॉ. मानसी जाधव,  प्रा. दीपा जामनिक, डॉ. शुभम धूत आणि पृथ्वी इंगोले यांच्या परीक्षण समितीने स्पर्धेकांच्या सादरीकरणाचे परिक्षण केले.

श्रद्धा शिरोडकर यांनी राज्यस्तरीय द्वितीय स्थान पटकावून राष्ट्रीय फेरीत प्रवेश केल्याबद्दल नेहरूयुवा केंद्राचे उपसंचालक कालिदास घाटवळ यानी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×