नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे/प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. पै. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाचा मान धुळे जिल्ह्यास मिळाला आहे. ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असल्याने या स्पर्धेचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे नियोजन करावे. अशा सूचना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिल्या.
स्व. पै. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा धुळ्यात 21 ते 25 फेब्रुवारी, 2023 दरम्यान गरुड मैदानावर होणार आहे. या स्पर्धेच्या आयोजन समितीची बैठक पालकमंत्री श्री. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस खासदार डॉ सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, कोल्हापूर विभागाचे क्रीडा उपसंचालक संजय सबणीस, नाशिक विभागाच्या क्रीडा उपसंचालक श्रीमती सुनंदा पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, शिक्षणाधिकारी माध्यमिक मोहन देसले, अनुप अग्रवाल, उमेश चौधरी, सुनील चौधरी, कमलाकर अहिरराव, राष्ट्रीय खेळाडू महेश बोरसे आदि उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, धुळे जिल्ह्याला कुस्तीची परंपरा लाभली असून ती अजतागायत सुरु आहे. धुळ्यातील मल्लांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गाजविल्या आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्हावासियांना एक आनंदाची पर्वणी राहणार असल्याने या स्पर्धेच्या आयोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी. या स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या सर्व समित्या तातडीने गठीत करुन कामांचे वाटप करण्याच्या सुचनांही त्यांनी दिल्यात.
स्व. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा 21 ते 25 फेब्रुवारी, 2023 या कालावधीत गरुड मैदान, धुळे येथे संपन्न होणार आहेत. ही स्पर्धा फ्री स्टाईल, ग्रीको रोमन व मुलींचा संघ अशा प्रत्येकी दहा वजनगटात तीस संघ सहभागी होणार आहे. प्रत्येक संघात 7 खेळाडू, 1 क्रीडा मार्गदर्शक व 1 व्यवस्थापक असा एकूण 9 जणांचा समावेश राहील. या स्पर्धेत 360 वरिष्ठ कुस्तीगीर, 100 पंच व पदाधिकारी तसेच 50 स्वयंसेवक व समिती सदस्य असे एकूण 650 जण सहभागी होणार आहेत. या स्पर्धा तीन पोडियममध्ये मॅटवर लावण्यात येणार आहेत. या स्पर्धेत एकूण 31 लाख 20 हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडू व इतर यांची भोजन, निवास, प्रवास खर्च देण्यात येणार असून प्रेक्षकांसाठी गरुड मैदानावर प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार असल्याचे क्रीडा उपसंचालक श्रीमती सुनंदा पाटील यांनी सांगितले. स्पर्धेचे प्राथमिक नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी बैठकीत दिली.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी धुळे शहर महानगरपालिका, धुळे जिल्हा तालीम संघ तसेच स्थानिक पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचेही सहकार्य लाभणार आहे. बैठकीत उपस्थित मान्यवरांनी विविध उपयुक्त सुचना मांडल्या. या सुचनांवर कार्यवाही करण्याचे पालकमंत्र्यांनी बैठकीत सांगितले.
तत्पूर्वी पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते स्व. पै. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.
Related Posts
-
उदगीर येथे राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. लातूर / प्रतिनिधी - शालेय जीवनापासूनच…
-
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विभागीय केंद्राच्या प्रांगणात स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण
अमरावती/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी केवळ राजकीयच…
-
सिंधुदूर्गातील चिपी विमानतळाला बॅ.नाथ पै याचं नाव
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सिंधुदूर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला…
-
भारतीय कुस्ती महासंघाविरुद्धच्या आरोपांच्या चौकशीसाठी खेलरत्न एमसी मेरी कॉम यांच्या अध्यक्षतेखाली निरीक्षण समिती स्थापन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय कुस्ती महासंघाच्या…
-
ब्रम्हपुरीत रंगला महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धेचा थरार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. चंद्रपुर/प्रतिनिधी - ब्रम्हपुरी शहराचे शिक्षण…
-
६४ व्या वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२१-२०२२ चे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा - महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित…
-
ज्येष्ठ इतिहास संशोधक नामदेवराव जाधव यांनी भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. पुणे/प्रतिनिधी - २०२४ च्या लोकसभा…
-
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन समिती मार्फत पदवी व पदविका अभ्यासक्रम राबविण्यात येणार
मुंबई/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अनेक वर्षे केवळ कागदावर…
-
कल्याण मध्ये १६ एप्रिलला आमदार चषक राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण शहरात पहिल्यांदाच…
-
बीड मधील स्व.केशरकाकू फ्रुट आडत मार्केट टाकणार कात
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - बीड शहरातील व तालुक्यातील…
-
कल्याणात २ ऱ्या आमदार चषक राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेचे आमदार…
-
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणूकीत काँग्रेसच्या जयश्री चंद्रकांत जाधव विजयी
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर - 276-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट…
-
वालधुनीच्या स्व.मीनाताई ठाकरे समाज मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्थेअभावी वापराविना पडून असलेल्या…
-
महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक,मोदींना दिला महागाईचा चषक भेट
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - इंधनदरवाढीबाबत वारंवार निवेदने देऊन देखील केंद्र सरकारला कोणताही…
-
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती निवड चाचणीत एसटी महाविद्यालयाच्या खेळाडूंचे वर्चस्व
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - मुंबई विद्यापीठांतर्गत आयोजित करण्यात…
-
खोपोली येथे कुस्ती महर्षी भाऊ कुंभार संकुलाचे उद्घाटन
प्रतिनिधी. रायगड - मागील वर्षी "खेलो इंडिया" च्या माध्यमातून भरविण्यात…
-
कल्याणच्या कुस्ती पैलवान नेहा गायकवाडची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली…
-
नवी मुंबई महानगरपालिका केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - विविध खेळांमधील खेळाडूंना…
-
खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचं केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - भारताच्या युवा खेळाडूंना राष्ट्रीय…
-
स्व.यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन
सोलापूर/प्रतिनिधी - सांडपाण्याच्या नावाखाली पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आडून…
-
उपराष्ट्रपतींच्या हस्ते आदित्य बिर्ला मेमोरियल पोलो चषक २०२३ च्या विजेत्या संघास चषक प्रदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आदित्य बिर्ला मेमोरियल पोलो…
-
पश्चिम बंगालचा ग्रँड मास्टर मित्रबा गुहा ठरला आमदार चषक राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेचा विजेता
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/0e-vVqUa1Lc?si=Yd8sgyS2wpfIuCFG कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेचे…