नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत येणाऱ्या राज्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदूरे रेल्वेस्थानकापर्यंत एकूण ३७ रेल्वेस्थानके आहेत. ही रेल्वे स्थानके मुख्य मार्गापर्यंत जोडणाऱ्या पोहोच मार्गांची देखभाल व दुरुस्तीची कामे लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. रेल्वे स्थानकापासून मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचा लवकरच कायापालट होणार आहे. त्याचप्रमाणे, रेल्वे स्थानकाच्या परिसराचेही मोठ्या प्रमाणात सुशोभिकरण होणार आहे. यासंदर्भात कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे, कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला, यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार योगेश कदम, कोकण रेल्वेचे संचालक राजेश भडंग, मुख्य अभियंता नागनाथ राव, मुख्य व्यवस्थापक गिरीश करंदीकर, उप अभियंता सुधीर कुलकर्णी, राजन तेली, दिपक पटवर्धन, केदार साठे, आदी उपस्थित होते.
कोकणातील पर्यटन स्थळांची ख्याती देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर पोचवण्यासाठी येथील पायाभूत सुविधांचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. आज झालेल्या सामंजस्य करारामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील रस्त्यांचा विकास होईल, जेणेकरून पर्यटन आणि स्थानिक विकासाला चालना मिळेल असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या परस्पर सहकार्यामुळे ही सर्व कामी गतीने पूर्ण होतील, तसेच कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांना याचा खऱ्याअर्थाने लवकरच फायदा होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
कोकणातील पर्यटनाला चालना देण्याकरिता रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग कोकण रेल्वे स्थानकाच्या पोहोच मार्गाची देखभाल दुरुस्ती व परिसरातील सुशोभीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्यांची १० वर्षापर्यंत देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. भविष्यात हा सामंजस्य करार ३० वर्षापर्यंत वाढविण्याची तरतूद करण्यात आली आहे.
या सामंजस्य करारानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रेल्वे स्थानकांच्या पोहोचमार्गाचे डांबरीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करुन या परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या सर्व प्रमुख रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण याच सामंजस्य कराराअंतर्गत हाती घेण्यात येणार आहे. या सुशोभीकरणाच्या अंतर्गत रेल्वे प्रवाश्यांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या रेल्वे स्थानकांचा परिसर हा अत्याधुनिक स्वरुपाचा करण्याचा आमचा मानस असल्याचेही मंत्री चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.
Related Posts
-
कोकण रेल्वे मार्गाचे आणि इतर रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण
पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळुरू, कर्नाटक येथील…
-
चिखलोली रेल्वे स्थानक, कल्याण-बदलापूर तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेला वेग
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण-बदलापूर दरम्यान तिसरा…
-
महाराष्ट्रातील ९ दिव्यांगासह सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिकला राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील 9 दिव्यांगासह सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक…
-
सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाजानुसार अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली…
-
कोकण वासियांचा प्रवास सुखकर होण्यासाठी आ. राजू पाटील यांचे रेल्वे मंत्र्यांना पत्र
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण ग्रामीण/संघर्ष गांगुर्डे - प्रतिनिधीगणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी…
-
सार्वजनिक वाचनालय व केडीएमसी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराचे वितरण
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - शब्दांची ताकद खूप मोठी असून…
-
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूखंडांची ‘लॅण्ड बॅंक’ तयार करण्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचे…
-
टिटवाळा रेल्वे स्थानकात मानसिक तणावामुळे रेल्वे होमगार्डची आत्महत्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - गाडी पार्किंग वरून…
-
ठाणे जिल्ह्यात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन व विक्रीस बंदी
ठाणे- (संघर्ष गांगुर्डे) जिल्ह्यामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य धुम्रपानाचे पदार्थ इत्यादीची…
-
दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात…
-
गणेशोत्सवासाठी बाप्पांचाही कोकण रेल्वेचा प्रवास
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - कोकणात गणेशोत्सव…
-
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात…
-
रेल्वे पास देणेबाबत केडीएमसी सज्ज, रेल्वे तिकीट काउंटर शेजारी पालिकेचे मदत कक्ष
कल्याण /प्रतिनिधी - कोरोना निर्बंधामुळे बंद असलेली मुबईची जीवनवाहिनी लोकल…
-
कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने चाकरमान्यांची तारांबळ
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - ANC :…
-
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय व एशियाटिक सोसायटीतील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखित होणार डिजिटल
मुंबई/प्रतिनिधी - मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचे आणि…
-
रेल्वे दरोडा,लैंगिक अत्याचार प्रकरणातील सर्व आरोपीना अटक,कल्याण रेल्वे पोलिसांची कामगिरी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला…
-
बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे पुलाला भगदाड
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार / प्रतिनिधी - गुजरात, मध्य…
-
मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीअर्ज व नुतनीकरणासाठी मुदतवाढ
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे…
-
रेल्वे प्रशासनाची महिला सुखसुविधांबाबत उदासीनता,रेल्वे प्रवासी महिला संघटनेचा काळी फीत लावून निषेध
नेशन न्यूज़ मराठी टिम. https://youtu.be/UHLuc_6Ox6A डोंबिवली/ संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली…
-
कल्याण रेल्वे स्थानकात सापडले ५४ डिटोनेटर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण रेल्वे स्थानकात…
-
डोमेसाईल दाखल्यावरील INDIA व Citizen of india ही अक्षरे मोठी व गडद करण्याची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - सेतू मधून देण्यात येणार्या डोमेसाईल दाखल्यावरील INDIA…
-
दिवा रेल्वे स्थानकाचा लवकरच होणार कायापालट
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण ग्रामीण/संघर्ष गांगुर्डे -दिवा रेल्वे स्थानकातील…
-
नवी दिल्लीतून जनऔषधी रेल्वे रवाना
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - जनौषधीचा प्रसार करण्यासाठी…
-
मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींचे प्रदर्शन व विक्री
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - महाराष्ट्र लघु…
-
चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वे सेवेला सुरुवात
जळगाव/प्रतिनिधी - चाळीसगाव-धुळे रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मेमू रेल्वे सेवेला आजपासून प्रारंभ…
-
बारावीच्या निकालामध्ये कोकण विभागाने मारली बाजी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - शैक्षणिक जीवनात बारावीची…
-
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी आवाहन
प्रतिनिधी. औरंगाबाद - भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2020-21 या…
-
कोकण भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी. नवी मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांच्या…
-
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरती
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरतीTeam DGIPR द्वारापदाचे नाव – जतन…
-
महाप्रित व आय.आय.टी. मुंबई यांच्यात कार्बन कॅप्चरिंग व ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानाबाबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा…
-
३० व ३१ ऑक्टोबरला एमपीएससी परीक्षार्थी व परीक्षेचे काम पाहणाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी…
-
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागतर्फे अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सामाजिक न्याय व विशेष…
-
राष्ट्रीय क्रीडा व साहसी पुरस्कार प्रदान,महाराष्ट्रातील ११ खेळाडू व ३ संस्थांचा समावेश
नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय युवा कल्याण तथा क्रीडा मंत्री अनुराग…
-
भूदान व ग्रामदान जमिनींसाठी अभ्यास समिती नियुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील भूदान व ग्रामदान…
-
डोंबिवली पेंढारकर कॉलेज व घरडा सर्कल परिसरात प्रायोगिक तत्वावर सम विषम व नो पार्किंग
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील…
-
रेल्वे रुळावरून घरी जाणाऱ्या प्रवाशी महिलेवर लैंगिक अत्याचार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - टिटवाळा येथील धक्कादायक…
-
रेल्वे स्टेशनवर हातचलाखीने प्रवाशांचे मोबाईल चोरणारे जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - रेल्वे प्रवासात ,रेल्वे स्टेशनवर…
-
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी…
-
वंदे भारत एक्सप्रेसला रेल्वे प्रवाशांची पसंती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्रातून धावणाऱ्या चारही वंदे…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रात ६१५ खाटांचे रुग्णालय व नवीन पदव्युतर अभ्यासक्रम सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रात…
-
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन समिती मार्फत पदवी व पदविका अभ्यासक्रम राबविण्यात येणार
मुंबई/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अनेक वर्षे केवळ कागदावर…
-
भेंडी दिन व भेंडी लागवड प्रशिक्षण संपन्न
कल्याण प्रतिनिधी - कल्याण तालुक्यामध्ये मौजे पोई येथे तालुका कृषी अधिकारी कल्याण यांचे मार्फत भेंडी दिन व शेतकरी प्रशिक्षणनुकतेच…
-
बाप्पांचा परतीचा प्रवास यंदा देखील रेल्वे रुळांवरूनच
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - गणेश चतुर्थी पासून मनोभावे पूजा अर्चा करून आज…
-
तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी राष्ट्रीय पोर्टल सुरु
मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून तृतीयपंथीय…
-
आदिवासी आश्रम शाळा व कर्मचारी यांचे आंदोलन
नेशन न्यूज' मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - आदिवासी विकास…
-
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -आरोग्यदायी निरोगी जीवनशैली आणि सार्वजनिक…
-
कल्याण शीळ रोडवर रेल्वे पोलिसांच्या गाडीला भीषण आग
डोंबिवली/प्रतिनिधी - कल्याण शीळ रोड काटई नाका परिसरात रेल्वे पोलिसांच्या…
-
राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात सामंजस्य करार
मुंबई/प्रतिनिधी - इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणे (IISER)…