नेशन न्यूज मराठी टीम.
नांदेड/प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून आज आंबेडकर भवन,दादर येथील पार पडलेल्या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडी-शिवसेना अधिकृत युतीची घोषणा झाल्यानंतर नांदेड येथे युवासेना-वंचित बहुजन युवा आघाडी यांच्यावतीने आनंद साजरा करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. एकंदरीत बघता दोन्ही पक्षातील कार्यकर्ते यांच्यात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश युवा कार्यकारिणी सदस्य अक्षय बनसोडे, व्यंकटेश मामीलवाड जिल्हाप्रमुख, युवासेना,नांदेड जिल्हा, युवासेना तालुका प्रमुख संतोष हंबर्डे, संतोष देशमुख, युवासेना समन्वयक वैभव भारती, तालुका चिटणीस प्रवीण हंबर्डे, वं.ब.आ चे शहराध्यक्ष गोपालसिंग टाक, युवासेना शहरप्रमुख आनंद घोगरे, महासचिव शुद्धोधन कापसीकर,धनराज पाटील वरपडे,राज बुद्धे,सोनबा पाटील, वीरप्रताप सिंग टाक,आदी उपस्थित होते.