नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – केंद्र सरकारने अनिवार्य केलेल्या मानकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए ), अमेझॉन , फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या ई-वाणिज्य कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने नोटीस जारी केल्यापासून 7 दिवसांच्या आत ई-वाणिज्य कंपन्यांकडून प्रतिसाद मागितला आहे, निर्धारित वेळेत प्रतिसाद न दिल्यास या कंपन्यांविरुद्ध ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या तरतुदींनुसार आवश्यक कारवाई केली जाऊ शकते.
भारतीय मानक ब्युरोच्या (बीआयएस ) महासंचालकांनी देखील या प्रकरणाची त्वरित दखल घेऊन आवश्यक कारवाई करावी , अशा आशयाचे पत्र ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने त्यांना लिहिले आहे.
केंद्र सरकारने जारी केलेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशांचे (क्यूसीओ ) उल्लंघन करणाऱ्या बनावट आणि नकली वस्तूंची विक्री रोखण्यासाठी ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने देशव्यापी मोहिमेची व्याप्ती वाढवली आहे. यात इलेक्ट्रिक इमरर्जन वॉटर हीटर्स, इलेक्ट्रिक इस्त्री, घरगुती गॅस स्टोव्ह, मायक्रोवेव्ह ओव्हन, शिलाई मशीन यांसारख्या ग्राहकोपयोगी वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.
अशा वस्तूंचे उत्पादन किंवा विक्रीशी संबंधित अनुचित व्यापार पद्धती आणि ग्राहक हक्कांचे उल्लंघन तपासून ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यासाठी प्राधिकरणाने यासंदर्भात संपूर्ण भारतातील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे.
Goods or articles | Indian Standard | Title of Indian Standard |
(1) | (2) | (3) |
Toys | IS 9873 (Part 1) : 2018 | Safety of Toys Part l Safety Aspects Related to Mechanical and Physical Properties. |
IS 9873 (Part 2) : 2017 | Safety of Toys Part 2 Flammability | |
IS 9873 (Part 3) : 2017 | Safety Requirements for Toys Part 3 Migration of Certain Elements. | |
IS 9873 (Part 4) : 2017 | Safety of Toys Part 4 Swings, Slides and Similar Activity Toys for Indoor and Outdoor Family Domestic Use. | |
IS 9873 (Part 7) : 2017 | Safety of Toys Part 7 Requirements and Test Methods for Finger Paints. | |
IS 9873 (Part 9) : 2017 | Safety of Toys Part 9 Certain Phthalates Esters in Toys and Children’s Products | |
IS 15644: 2006 | Safety of Electric Toys. |
Amazon
Flipkart
Snapdeal
S No. | Name of the Product | Product link |
1. | STALLION TRADING Dancing cactus Musical toys for Boys/Girls/Baby toys/Singing Recording Repeat What You Say Funny Education Toys for Kids | https://www.snapdeal.com/product/stallion-trading-dancing-cactus-musical/660513683524 |
2. | Rattle Toys for Kids, Set of 4 Pcs – Colourful Lovely Attractive Rattles and Teether for Babies, Toddlers, Infants & Children Rattles Rattle Toys for Infants | https://www.snapdeal.com/product/rattle-toys-for-kids-set/679616823237 |