महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
राजकीय

दिव्याच्या विकासावरून राजकीय नेत्यांवर आमदार राजू पाटील आक्रमक, दिव्याचा वासेपूर केल्याचा दिला टोला

नेशन न्यूज मराठी टीम.

https://youtu.be/JvC41ISiJpg

कल्याण ग्रामीण/प्रतिनिधी – बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नुकताच दिव्यातील एका कार्यक्रमात भाषण केले होते. सध्या याच भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून मनसे आमदार राजू पाटील यांनी नरेश म्हस्के यांना टोला हाणत सांगितले की , हे काय दिव्याचे सिंगापूर करणार आहेत. दिव्याचा या सर्वांनी वासेपूर करून टाकला आहे.अश्या शब्दात मनसे आमदार राजू पाटील यांनी टोला लगावला आहे.

दिवा शहरात ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के नुकतेच आले होते. यावेळी आपल्या भाषणात दिवा शहराचा विकास आमाचा पक्ष आणि नेते करत आहेत असे म्हस्के ठासून सांगत होते. त्यावेळी आम्हाला पण सिंगापूर बनवायचे आहे,असे वक्तव्य केले आणि याच भाषणाचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे. आता यावरूनच मनसे आमदार यांनी टोला हाणत सांगितले की खरं तर खूप हस्यासपद बोलले आहेत ते,माझे मित्र नरेश मस्के ठाणे महानगरपालिकेचे महापौर होते. उपमहापौर दिव्यात राहतात. ८ वर्षात काय दिवे लावले असते ते दिसले असते ना ! सिंगापूर करायच्या हे वार्ता करतात.

सिंगापूरला कचऱ्याच्या प्रकल्प मधुन खत बनते, त्याच्यावर गार्डन बनवले आहेत. तर आमच्या दिव्यात हे कचरा आणून टाकत आहेत.हे काय दिव्याचे सिंगापूर करणार आहेत. दिव्याचा या सर्वांनी वासेपूर करून टाकला आहे आणि याची ती गँग आहे, ते अजून दिवा ओरबाडत आहेत. त्यामुळे लोकांना गृहीत धरून आम्ही सिंगापूर करू मग मत द्या, हे आता त्यांनी विसरावं लोक काही एवढी मूर्ख राहिली नाहीत, त्यांना यावेळेस दिवेकर जो धडा द्यायचा तो देतील. असं मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×