नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण ग्रामीण/ संघर्ष गांगुर्डे – गेल्या तीन दशकांपासून मुंब्रा दिवा डोंबिवली रस्त्याचा प्रस्ताव हा कागदावरच राहिला असून आता आर्थिक टंचाईमुळे तो मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र आता या रस्त्याकडे सत्ताधारी दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. सतत पाठपुरावा करून देखील अन्य कारण पुढे करून सत्ताधारी या रस्त्याकडे मात्र दुर्लक्ष करत आहेत. ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यात या रस्त्यांच्या वेळी मंजूरीसाठी असलेल्या इतर रस्त्यांची कामे सुरु देखील झाली असून मनसे आमदार राजू पाटील यांनी मागणी केलेल्या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आमदार राजू पाटील पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात रस्त्याच्या मंजुरीसाठी लक्षवेधी मांडत सरकारचे याकडे लक्ष वेधले आहे.
ठाणे जिल्ह्यात नागरीकीकरण झपाट्याने वाढत आहे. मध्य रेल्वे सह वाहनांनाही प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण झाले आहेत. त्यामुळे तत्कालीन डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिश्चंद्र पाटील यांनी पहिल्यांदा डोंबिवली मुंब्रा समांतर रस्ता तयार करण्याची मागणी केली होती. त्यावेळी तत्कालीन आमदार व आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या रस्त्यासाठी समर्थन दर्शवले होते. या संदर्भात २००७ साली एमएमआरडीएच्या बैठकीत रस्त्याचा डीपीआर तयार करण्यासाठी ९३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्या नंतर पर्यावरण विभागाच्या परवानगी अभावी हा रस्ता कागदावरच राहिला होता.
या नंतर आता कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक वाढल्याने सर्वाधिक ताण हा कल्याण शीळ रस्त्यावर येत आहे. त्यामुळे सततच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं समर्थन असलेल्या रस्त्याच्या मंजुरीसाठी निवेदन देखील दिले होते. मात्र अन्य रस्त्यांच्या कामांना मंजुरी देऊन रेल्वे समांतर रस्ता अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत ठेवलं आहे. त्यामुळे जर या रस्त्याच्या कामासाठी शासनाने मंजुरी दिल्यास वाहतूक कोंडी वर मात करण्यात यश येणार आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांची वाहतूक कोंडी मधून भविष्यात देखील मुक्तता होणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी तातडीने मंजुरी देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी हिवाळी अधिवेशनत केली आहे. डोंबिवलीकरांच्या प्रवासाच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे.वाहनचालकांना पाऊण तासाच्या प्रवासाला अवघ्या पाच मिनिटांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी मंजुरी देखील मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. मात्र याकडे सत्ताधारी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
पावसाळ्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसात रेल्वे सेवा बंद होते. तर दिवा पश्चिमेला जाणारा पुल पावसाळ्यात बंद होत असतो. त्यामुळे अश्या वेळी पर्यायी मार्गाची आवश्यकता आहे. मात्र सत्ताधारी या मार्गाच्या मंजुरीला दुर्लक्षित करत असल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी लक्षवेधी हिवाळी अधिवेशनात मांडली आहे.
मुंब्रा ते डोंबिवली हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -०३ जुना व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक – ०८ जुना मार्गे काटई नाका कर्जत मार्गे खोपोली येथे पोहचणार आहे. तर शिळफाटा मार्गावरून जाणाऱ्या वाहनांसाठी मुंब्रा कौसा रस्ता आणि मोठा गाव डोंबिवली ते माणकोली राष्ट्रीय महामार्ग जोड रस्ता या रस्त्यांच्या कामांना मंजुरी देखील देण्यात आली आहे. मात्र मुंब्रा ते डोंबिवली रेल्वे रुळांना समांतर रस्त्याची मागणी करण्यात आली आहे. ज्या रस्त्याची मागणी करण्यात आली आहे ती ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यात देखील आहे. मात्र तिला मंजुरी देण्यास शासन टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.असही आमदार राजू पाटील म्हणाले.