नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – 2023 या वर्षासाठी नाडा इंडियाची( राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्था) आरटीपी यादी नाडा इंडियाच्या वेबसाईटवर 1 जानेवारी 2023 पासून उपलब्ध होणार आहे. नाडा इंडियाच्या आरटीपी 2023 यादीमध्ये एकूण 149 खेळाडू असून त्यात 60 महिला आणि 89 पुरुष खेळाडूंचा समावेश आहे. ही यादी सर्वोच्च प्राधान्यक्रमाच्या क्रीडाप्रकारांमधील जोखमींच्या सर्वसमावेशक मूल्यांकनावर आधारित आहे. यामध्ये 7 दिव्यांग क्रीडापटूंचा देखील समावेश आहे.
सर्व संबंधिंत खेळाडूंना आरटीपी यादीत समावेश केल्याची नोटिस पाठवण्यात आली असून तिची प्रत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघाना देण्यात आली आहे.
या यादीत असलेल्या सर्व खेळाडूंनी रात्रीच्या मुक्कामासाठी त्यांच्या पत्त्यासह त्यांच्या दिनक्रमाचे वेळापत्रक, स्पर्धांचे वेळापत्रक आणि ठिकाण यांसह त्यांच्या वास्तव्याची माहिती दर तीन महिन्यांनी आणि चाचणीसाठी उपलब्ध असतील आणि संपर्कप्राप्त असू शकतील आणि देऊ न शकलेली चाचणी पुन्हा करण्यासाठी असा दररोज 60 मिनिटांचा कालावधी कळवणे गरजेचे आहे.योग्य प्रकारचे नियोजन करण्यासाठी खेळाडूंनी प्रत्येक तिमाहीचा प्रारंभ होण्यापूर्वी 15 दिवस आधी प्रत्येक तिमाहीचा तपशीलवार कार्यक्रम देणे गरजेचे आहे.
खेळाडूला आपल्या ठिकाणाची माहिती वेळोवेळी कळवणे गरजेचे आहे, असे न झाल्यास आपल्या ठिकाणाची माहिती कळवण्यात अपयश आल्याची नोटिस या खेळाडूला पाठवण्यात येईल. आरटीपीमधील खेळाडूला 12 महिन्यांच्या कालावधीत आपल्या ठिकाणाची माहिती कळवण्यात तीन वेळा अपयश आल्यास( ज्यामध्ये माहिती देण्यात आलेले अपयश आणि/ किंवा चुकवलेली चाचणी यांचे एकत्रीकरण असेल.) ही कृती उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांचा भंग मानली जाईल.अशा खेळाडूवर 12 ते 24 महिन्यांच्या अपात्रतेची(पहिला गुन्हा) किंवा अशाच प्रकारे पुन्हा गुन्हा घडल्यास अधिक कालावधीच्या अपात्रतेची कारवाई केली जाईल.
नाडा इंडिया खेळाडूंना त्यांच्या वास्तव्याची माहिती वाडा( जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्था) एडीएएमएस मंचावर किंवा खेळाडूच्या केंद्रीय अर्जात भरण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी देखील प्रयत्न करत आहे.
- नाडा इंडियाच्या आरटीपी 2023 यादीत 24 क्रीडाप्रकारांमधील एकूण 149 खेळाडूंचा समावेश
- या यादीत 7 दिव्यांग खेळाडूंचा देखील समावेश,1 जानेवारी 2023 पासून ही यादी नाडा इंडियाच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल.