महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image लोकल बातम्या

औरंगाबाद मध्ये महापुरुषांच्या सन्मानार्थ आंबेडकरवादी सर्वपक्षीय भव्य नागवंशी शुर मोर्चा

नेशन न्यूज मराठी टीम.

औरंगाबाद/प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टीचे राज्यपाल मंत्री आमदार खासदार यांच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून महापुरुषांचा वेगवेगळ्या पद्धतीने अपमान करणे हे सत्र चालूच आहे याच्या विरोधात भाजप आणि आरएसएसच्या विशाल धारेच्या विरोधात आंबेडकरवादी सर्व पक्ष संघटनांच्या वतीने भव्य नागवंशी शुर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यात राज्यपाल त्याच प्रमाणे मंत्री चंद्रकांत पाटील व महापुरुषान बद्दल अपमानजनक विधान करणाऱ्याविरोधात घोषणा देण्यात आल्या व त्यांचा निषेध करण्यात आला.

या मोर्चा मध्ये विविध मागण्या करण्यात आल्या. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांची तात्काळ महाराष्ट्रात महाकालपट्टी करण्यात यावी तसेच भाजपा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा व पुणे येथील मनोज गरबडे व त्यांच्या सहकार्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे. या प्रमुख मागण्या होत्या.

मोर्चात दिनकर ओंकार,अरुण बोर्डे ,विजय वाहूळ, अरविंद कांबळे, सतीश पटेकर, संदीप वाहूळ हे उपस्थित होते त्याचबरोबर विविध पक्ष,संघटनेचे नेते कार्यकर्ते व प्रचंड मोठा जनसमुदाय मोर्चा सहभागी होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×