महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image चर्चेची बातमी यशोगाथा

राष्ट्रीय खनिज विकास प्राधिकरणाने जिंकला ‘इंडस्ट्री एक्सलन्स २०२२ पुरस्कार’

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – राष्ट्रीय खाण कामगार अर्थात NMDC ने शुक्रवार, 16 डिसेंबर 2022 रोजी चेन्नई येथे झालेल्या कार्यक्रमात प्रतिष्ठित IEI (इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स, इंडिया) तर्फे दिला जाणारा ‘इंडस्ट्री एक्सलन्स पुरस्कार 2022’ जिंकला.

देशातील सर्वात मोठ्या लोहखनिज उत्पादक असलेल्या राष्ट्रीय खनिज विकास प्राधिकरणाचा 37व्या भारतीय अभियांत्रिकी परिषदेत उत्कृष्ट कामगिरी आणि व्यावसायिक उत्कृष्टतेसाठी सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय खनिज विकास प्राधिकरणाच्या वतीने एन. आर. के. प्रसाद, मुख्य महाव्यवस्थापक (IE & MS), यांनी तामिळनाडू सरकारचे उच्च शिक्षण मंत्री डॉ. के पोनमुडी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.

इंस्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स (इंडिया)ने बिजनेस ऑपरेशन्स, आर्थिक कामगिरी, पर्यावरणीय कामगिरी, संशोधन आणि विकास, सीएसआर व कंपनीच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स धोरणांचे पुनरावलोकन करुन राष्ट्रीय खनिज विकास प्राधिकरणाला (NMDC) हा उद्योग उत्कृष्टता पुरस्कार प्रदान केला आहे. पर्यावरणपूरक, आर्थिक आणि कार्यक्षम दृष्टिकोनासह, राष्ट्रीय खनिज विकास प्राधिकरण आपले देशांतर्गत नेतृत्व टिकवून ठेवण्यासाठी आणि जागतिक स्तरावरील खाण कंपनी बनण्याच्या दिशेने परिवर्तन प्रकल्प हाती घेत आहे.

एनएमडीसीने सुरुवातीपासूनच राष्ट्राच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण आर्थिक योगदान देण्याचा दृढनिश्चय केला आहे, असे राष्ट्रीय खनिज विकास प्राधिकरणाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुमित देव याप्रसंगी म्हणाले. कंपनीने प्रत्येक तिमाहीत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण व्यवसाय धोरणे तयार करण्यासाठी अपार प्रयत्न केले आहेत. त्यामुळे प्राधिकरण या पुरस्कारास पात्र आहे. कर्मचारी संघाचे त्यांच्या वचनबद्धतेबद्दल आणि प्रामाणिकपणाबद्दल अभिनंदन,” असेही दे यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×