नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात बोलताना, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. त्यानंतर भाजप नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज तसेच महापुरुषाबद्दल वादग्रस्त विधान सूरूच होते. याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी आक्रमक झाली आणि महाविकास आघाडीने महामोर्च्याचे आयोजन केले.महापुरूषांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी महाविकासआघाडीचा मुंबईत महामोर्चा मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणत प्रतिसाद दिला. महाविकास आघाडीचे सर्वच मोठे नेते यात सहभागी असल्याचे दिसून आले.
जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा महामोर्चा मोर्चा होता. फक्त राज्यपालच नाही तर महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांविरोधात हा मोर्चा आहे, असे उद्धव ठाकरेंनी या वेळी म्हणाले यावेळी दिला. खुर्ची गेली तर बेहत्तर पण महाराष्ट्राच्या स्वाभीमान आणि अस्मितेशी तडजोड करणार नाही. असं कोणी करण्याचा प्रयत्न करेन, त्याला गुडघ्यावर खाली झुकवल्याशिवाय राहणार नाही, कारण ही शिवसेना आहे असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांना टोला लगावला.
त्याच बरोबर एनसीपी अध्यक्ष शरद पवार सुद्धा विरोधकावर आक्रमक झाले, ते म्हणाले छत्रपती शिवरायांबद्दल चुकीचे वक्तव्य महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. आज आम्ही लाखोंच्या संख्येने या संदर्भात आमच्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी जमलो आहोत. या महामोर्चाच्या माध्यमातून आज दिलेल्या इशाऱ्यापासून राज्यकर्त्यांनी धडा घेतला नाही तर महाराष्ट्र गप्प बसणार नाही, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांची नावे महाराष्ट्राशी जोडलेली आहेत. आजचे राज्यकर्ते त्यांचा अपमान करतात. राज्यपाल कोश्यारी यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले की, राज्याच्या इतिहासात असा राज्यपाल कधीच पाहिला नाही. या मोर्चातून हे राज्यकर्ते काही तरी धडा घेतील अशी आशा आहे आणि तसे झाले नाही तर पुढच्या वेळी एकत्र बसून त्यांना कसे उखडून टाकायचे याचा विचार करू, असे पवार म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राउत, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात वर्षा गायकवाड आदींनी सहभाग घेतला. या महामोर्च्यात या नेत्यांसह विविध राजकीय पक्ष, कामगार संघटना, कामगार, युवक-युवती, शिक्षकही सहभागी झाले होते.

विविध प्रकारचे पोस्टर,बॅनर झेंड्यांनी हा मोर्च्या भरून गेला होता, अनेक पोस्टर बॅनर झेंड्या मध्ये राज्यपाल यांचा रावणाच्या रूपातील पोस्टर सर्वाचे लक्ष वेधून घेत होता महाविकास आघाडी कडून सोशल मीडियावर महामोर्चाचे फोटो शेयर केले आहेत. त्यात एका दहा तोंडी रावणाच्या पोस्टरच्या मुख्य मुखासाठी, कोश्यारी यांचे छायाचित्र वापरलेले आहे. इतर मुखांसाठी भाजप नेत्यांची छायाचित्रे वापरली आहेत.त्यात दशमुखी रावणाच्या रूपात भाजप नेते रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, राम कदम आदी भाजप नेत्यासाह शिंदे गटाचे अब्दुल सत्तार व त्याच बरोबर इतर दाखविण्यात आले होते.