नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली /संघर्ष गांगुर्डे – कलेला सीमा, जात, धर्म काहीही नसते. त्याचप्रमाणे कलेला वयही नसत. या संगीत कलेत तल्लीन होऊन जस गायकाचे श्रोत्याला दुःख विसरायला लावले. गायनाचा आस्वाद घेणारा श्रोता तहान-भूक विसरून मंत्रमुग्ध होतो.एवढंच काय गीत ऐकताना एखादया श्रोत्याचे पाऊले आपसूकच स्टेजच्या समोर थिरकतात.अगदी वयोवृद्धही आपलं वय विसरून तालावर नृत्य करताना दिसतात. डोंबिवलीत असाच एक बहारदार गीतांचा कार्यक्रम सर्वेश सभागृहात पार पडला एवं के. म्यूझिक मंत्र आयोजित ‘युही गीत गाते रहो’ मा कार्यक्रमाने डोंबिवलीकर सुखावले.
या कार्यक्रमान भाजपा चित्रपट कामगार आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय रणदिवे, कायदेशीर सल्लागार विनय डांगे, भाजप चित्रपट कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्यालय प्रमुख ज्ञानेश्वर काकड, शिक्षिका कामिनी आढाव (शहापूर), पर्यटन व तीर्थ यात्रेत सरकारी सेवेत उत्कृष्ट काम केलेले रविकांत जंगले, भाजप उद्योग आघाडी समाजसेवक ( खारघर – तळोजा मंडल) राजेंद्र मांजरेकर,जनजागृती सेवा कामती अध्यक्ष गुरुनाथ निरापणकर, सामाजिक कार्यकर्ते अरविंद्र सुर्वे, कैलास सणस, विशाल शेटे अनेक मान्यवर उपस्थित होते.