नेशन न्यूज़ मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्रात गायरान जमीन धारकांवर अन्यायकारक पध्दतीने राज्यभर कारवाई केली जात आहे. त्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याबद्दल चर्चा केली.
महाराष्ट्रभरामध्ये मोठ्या प्रमाणात गायरान जमीन धारकांना नोटीस पाठवून जमिनी रिकाम्या करण्याच्या नोटिसा तहसीलदारामार्फत लोकांना पाठवल्या असून, काही ठिकाणी घरं पाडण्यात आली आहेत. अशा प्रकारे दहशत निर्माण करणे निंदनीय आहे. जवळपास २२ लाख लोकांना याचा फटका बसला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने हा एकतर्फी निर्णय दिला आहे. महाराष्ट्र सरकारने अडवोकॅटे जनरल यांच्यामार्फत रिप्रेझेंट करून १७ नोव्हेंबर २००२ ची अंतिम तारीख अंमलबजावणी आणि अहवाल सादर करण्यासाठी दिली होती. त्या संदर्भात अधिकाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात यावी की, ह्या जीआरप्रमाणे ज्यांचे नियमितीकरण होतंय, त्याचे नियमितीकरण करावे. व त्याचा अहवाल उच्च न्यायालयाला पाठवावा. अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांनकडे केली होती.
आमची ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. आम्हाला आशा आहे की, राज्य शासनच न्यायालयात जाऊन ही भूमिका घेईल, असेही ते म्हणाले.