नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – मुंबई उच्च न्यायालयाकडून आज विचारवंत, लेखक प्रा. आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टानं एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. प्रा. तेलतुंबडे यांना भीमा कोरेगाव – एल्गार परिषद प्रकरणात 14 एप्रिल 2020 मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली होती.एनआयएनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर उच्च न्यायालयानं या आदेशाला आठवडाभरासाठी स्थगिती दिली आहे.
न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर आनंद तेलतुंबडे यांच्या जामीन अर्जावरील याचिकेवर सुनावणी पार पडली. आनंद तेलतुंबडेंची याचिका योग्य ठरवत मुंबई उच्च न्यायालयाकडून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
Related Posts