महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image पर्यटन लोकप्रिय बातम्या

युटीएस अॅपद्वारे अनारक्षित तिकिटांच्या बुकिंगसाठी अंतराशी संबंधित निर्बंध रेल्वे मंत्रालयाने केले शिथिल

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी-युटीएसऑनमोबाईल अॅपद्वारे अनारक्षित तिकिटांच्या बुकिंगसाठी अंतराशी संबंधित निर्बंध रेल्वे मंत्रालयाने शिथिल केले आहे.

  • युटीएसऑनमोबाईल अॅपवर अनारक्षित तिकिटे उपनगरी नसलेल्या विभागांसाठी 20 किमी पर्यंत अंतरावरून बुक केली जाऊ शकतात. पूर्वी अंतराची मर्यादा 5 किमीपर्यंत होती
  • उपनगरीय भागात, हे अंतर 2 किमी वरून 5 किमी पर्यंत वाढवण्यात आले आहे

युटीएसऑनमोबाईल (UTSONMOBILE) अॅपद्वारे अनारक्षित तिकिटे बुक करण्यासाठीच्या अंतराची सुविधा उपनगरी नसलेल्या भागांसाठी 20 किमी अंतरापर्यंत वाढवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. तर उपनगरीय भागासाठीचे अंतर वाढवून 5 किमीपर्यंत  करण्यात आले आहे.

यापूर्वी, अनारक्षित तिकीट बुकिंग प्रणाली युटीएसऑनमोबाईल अॅपच्या माध्यमातून  उपनगरीय नसलेल्या विभागातील प्रवाशांना 5 किमी अंतरापर्यंत  तिकीट बुक करता येत होते. तर उपनगरीय विभागासाठी, युटीएसऑनमोबाईलद्वारे तिकीट बुक करण्यासाठी अंतर मर्यादा 2 किमी होती.

अधिक तपशीलांसाठी या संकेतस्थळाला भेट द्या : “https://www.utsonmobile.indianrail.gov.in“.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×