महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
राजकीय

चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करणाऱ्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

नेशन न्युज मराठी टीम.

मुंबई – ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्या, मदत व बचाव कार्य करणाऱ्या सगळ्यांचेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट घोंघावत असतानाच चक्रीवादळाचा तडाखा बसला .संकट म्हटले तर मोठे होते, पण हे संकट आपण सगळ्यांनी परतावून लावले आहे. जनता व प्रशासनाने झुंज दिली व संकटाची तीव्रता कमी केली. दुर्दैवाने अपघातात दोन जीव गेले. कोकणात तसेच इतरत्र नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. मुंबा देवीचीच कृपा मुंबईवर आहे, तसे पंढरपूरच्या विठू माऊलींचे आशीर्वादही आहेत. मुख्य म्हणजे या वादळाचा सामना करणारे महापालिका अधिकारी, जिल्हा प्रशासन, आपत्कालीन व्यवस्थापन, वैद्यकीय पथके या सगळ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. वृत्तवाहिन्या सुद्धा लोकांना चांगली माहिती देत होत्या.निसर्गापुढे कोणाचेही काही चालत नाही. पण संकटकाळात महाराष्ट्र एक आहे. खंबीर आहे हे या वादळात दिसन आले. हीच आपली एकजूट महाराष्ट्राला सर्व संकटातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही

Translate »
×