महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image चर्चेची बातमी ठाणे

कल्याण मोहने परिसरात १३९ वीज चोरांविरुद्ध कारवाई,४१ लाखांची वीजचोरी उघडकीस

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – महावितरणच्या कल्याण पश्चिम विभागातील मोहने वीज वाहीनीवरील वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई सुरू आहे. गेल्या दीड महिन्यात या वाहिनीवरील १४९ वीज चोरट्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून ४१ लाख ५७ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. या भागात वीज चोरांविरुद्धची कारवाई निरंतरपणे सुरू राहणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

मोहने वीजवाहिनी क्रमांक सातद्वारे वडवली, अटाळी, आंबिवली, नवनाथ नगर, संतोषीमाता तसेच आंबिवली स्टेशन या परिसरास वीज पुरवठा केला जातो. कल्याण पश्चिम विभागात या वाहिनीची वीजहानी सर्वाधिक आहे. ही वीजहानी कमी करण्यासाठी उच्चदाब व लघुदाब तारा बदलणे, पोलवरील अतिरिक्त सर्विस वायर काढणे, निकामी मीटर बदलणे आणि वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई करण्याच्या उपाययोजना सुरू आहेत. गेल्या दीड महिन्यात वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार १३९ वीज चोरांवर कारवाई करून ४१ लाख ५७ हजार ८७० रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली असून संबंधितांना चोरीच्या विजेचे देयक देण्यात आले आहे. विहित मुदतीत वीजचोरीच्या देयकाचा भरणा न करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होण्यासाठी पोलिसात फिर्याद देण्यात येईल. घरात मिटरच्या इनकमिंग वायरला जॉईंट असणे, मिटर बायपास करणे, मिटरचे एम-सिल तोडणे, मिटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे.

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर व कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता दीगंबर राठोड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू आहे. वीजचोरी हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून या गुन्ह्यासाठी तीन वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर कटाक्षाने टाळावा व सुलभ पद्धतीने उपलब्ध असलेली अधिकृत वीजजोडणी घेऊन वीजवापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×