महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ठाणे ताज्या घडामोडी

केडीएमसीच्या कर्मचार्यांना १६ हजार पाचशे सानुग्रह अनुदान जाहीर

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासनाने पालिकेच्या तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱयांना गत वर्षी पेक्षा एक हजार रुपयांची वाढ करीत यंदाच्या दिवाळीसाठी पालिका कर्मचाऱ्यांना साडे सोळा हजार रुपये सानुग्रह अनुदान पालिका आयुक्त डॉ.भाऊ साहेब दांडगे यांनी जाहीर केल्याची घोषणा केली .महापालिकेतील तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱयांना दिवाळी बोनस जाहीर केल्याने कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे .

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून यंदाच्या दिवाळी साठी पालिका प्रशासन सानुग्रह अनुदान किती जाहीर होणार या बाबत उत्सुकता लागून राहिली होती. पालिकेतील विविध कर्मचारी संघटनांनी पालिका प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांना दिवाळी सानुग्रह अनुदाना साठी पालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेत मागणी केली होती .पालिका आयुक्तांनी महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करता पालिकेतील वर्ग एक आणि वर्ग २ चे अधिकारी वर्ग वगळून वर्ग-३ आणि वर्ग-४  वर्गातील पालिका कर्मचाऱ्या सह , शिक्षण विभाग , परिवहन विभागातील कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी अश्या अंदाजे सहा हजार कर्मचाऱयांना साडे सोळा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे .सानुग्रह अनुदानासाठी पालिकेच्या तिजोरी वर अंदाजे आठ कोटी रूपयांचा ताण पडणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×