नेशन न्युज मराठी टिम.
भिवंडी/प्रतिनिधी – सामान्य माणसाला सामाजिक व आर्थिक न्याय मिळवून देणे ही न्यायालय व वकिलांची जबाबदारी आहे. जिल्हा व तालुका न्यायालये ही न्याय व्यवस्थेचा गाभा आहेत. त्यामुळे सामान्य माणसाला न्याय देण्याची महत्वाची भूमिका ही न्यायालये बजावत असतात, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले.ठाणे जिल्हा सत्र न्यायालय, सार्वजनिक बांधकाम विभाग व भिवंडी वकील संघटनेच्या वतीने भिवंडी येथील दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) व न्याय दंडाधिकारीच्या नव्या इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती गौरी गोडसे होत्या. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण प्रमुख पाहुणे होते.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, ठाणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय मंत्री, भिवंडीचे दिवाणी न्यायाधीश शहजाद परवेझ, महाराष्ट्र बार कौन्सिलचे अध्यक्ष मिलिंद थोबडे, भिवंडी बार असोसिएशनचे अध्यक्ष मंजित राऊत, जयंत जायभावे आदी यावेळी उपस्थित होते. राज्य घटनेच्या उद्देशिकेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. भिवंडी न्यायालय इमारतीच्या स्मरणिकेचे व ध्वनिचित्रफितीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. यावेळी न्यायालयीन कर्मचाऱ्याच्या हस्ते न्यायालयाच्या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच इमारती च्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या संविधानाच्या उद्देशिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले.श्री. ओक म्हणाले की, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात समाजातील अनेक घटक हे आर्थिक, सामाजिक व राजकीय कारणांमुळे न्यायालयाचा दरवाजा ठोठावत नाहीत. अश्या लोकांना न्याय देण्याचे काम सर्वसामान्य लोकांचे न्यायालय म्हणून ओळखली जाणारी जिल्हा व तालुका न्यायालये करतात. त्यामुळे त्यांना दुय्यम न्यायालय म्हणू नये. सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी गेल्या ७५ वर्षात आपण काय मिळवायला हवं हे जाणून ते मिळविण्यासाठी कुठं कमी पडलो याचा विचार करायला हवा.
राज्यात गेल्या दहा वर्षात न्यायालयाच्या अनेक चांगल्या इमारती उभारल्या आहेत. परंतु अद्यापही न्याय व्यवस्थेसाठी चांगल्या सुविधा देण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवेत. न्याय व्यवस्थेसाठी चांगल्या सुविधा दिल्यास जलद न्याय मिळेल. त्याच प्रमाणे माहिती तंत्रज्ञानाचा न्याय व्यवस्थेमधील वापर वाढविण्यासाठी गांभीर्याने विचार व्हावा. त्यासाठी ठाणे जिल्ह्याने पुढाकार घ्यावा, असेही श्री. ओक म्हणाले.न्यायमूर्ती श्रीमती गोडसे म्हणाल्या की, भिवंडी न्यायालयाची सुंदर इमारत उभी राहिली आहे. आता या इमारतीमधून नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम न्यायालयाने व वकिलांनी करावे. भिवंडी न्यायालयातील गेल्या पाच ते दहा वर्षातील खटले लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी न्यायालयाने व वकिलांनी प्रयत्न करावेत. त्यातून नागरिकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल.
केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री पाटील म्हणाले की, नागरिकांना न्यायालयात कमीतकमी जावे लागेल यासाठी शासन प्रयत्न करत आहे. स्वामित्व योजनेमुळे न्यायालयातील खटले कमी होण्यास मदत होणार आहे. भिवंडी न्यायालयामधील डिजिटल ग्रंथालयासाठी खासदार निधीतून संपूर्ण मदत देण्यात येईल. तसेच येथे अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू होण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात आवश्यक ती तरतूद केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत उत्कृष्ट कामे केली जात आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गतिमान पद्धतीने काम करण्यासाठी बांधकाम विभाग नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. न्यायालयाच्या सुविधा वाढविण्यासाठी विभागाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. कल्याण न्यायालयासाठी जागा ठरवून दिल्यास त्या इमारतीचे काम तातडीने पूर्ण केले जाईल. देशपातळीवर भिवंडी चे नाव आणखी मोठे करण्यासाठी सर्व प्रयत्न करू.जिल्हा प्रमुख सत्र न्यायाधीश अभय मंत्री यांनी प्रास्ताविक केले. ऍड. राऊत यांनी स्वागत केले. न्यायमूर्ती श्रीमती देशमुख, श्री जामदार, श्री जायभावे, श्री. थोबडे, यांनीही मनोगत व्यक्त केले.
Related Posts
-
एमपीएससीच्या नवी मुंबईतील नव्या सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ८७…
-
भिवंडी ब्रेकिंग
भिवंडी शहरातील नारायण कंपाऊंड परिसरात मोती कारखान्याला भीषण आगआगीवर नियंत्रण…
-
नागपूर मध्ये नव्या तीन फास्टट्रॅक फॉरेंसिक-लॅबचे उद्घाटन,गुन्ह्याचा तपास होणार जलदगतीने
नागपूर/प्रतिनिधी - महाराष्ट्र पोलीस दलाची जागतिक पोलीस दल म्हणून ख्याती आहे.…
-
साहित्यवेदी’ संकेतस्थळाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- मराठी भाषेविषयीची एकत्रित माहिती साहित्यवेदी या संकेतस्थळावर ऑनलाईन…
-
भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी वंचितची चाचपणी
भिवंडी/संघर्ष गांगुर्डे - वंचित बहुजन आघाडी संघटना जास्तीत जास्त मजबूत…
-
नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सवाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महिला आर्थिक विकास महामंडळाच्या…
-
बंदर परिसर मासेमारीच्या नव्या हंगामासाठी सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - नारळी पौर्णिमेचा…
-
सिन्नर येथे दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे…
-
मंत्रालयात इट राईट अभियानाच्या फलकाचे उद्घाटन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - सर्वांना सकस आणि निर्भेळ…
-
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका सुधारित विकास आराखड्यामध्ये फेरबदल
मुंबई/प्रतिनिधी - भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका मंजूर सुधारित विकास आराखड्यामधील खेळाच्या…
-
मुंबईतील ‘डबेवाला भवन’चे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- बेस्ट बस आणि लोकल यांना मुंबईची…
-
ट्रॉम्बे युनिट मध्ये खतांच्या नवीन श्रेणींचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - केंद्रीय रसायने आणि खते…
-
पुणे कमांड रुग्णालयात कर्करोग उपचार केंद्राचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - पुण्यातील कमांड रुग्णालयात 30…
-
भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/ प्रतिनिधी - भिवंडी लोकसभा…
-
भिवंडी मतदारसंघात दुसऱ्या दिवशी दोन नामनिर्देशन पत्रे दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - पहिल्या दिवशी एकूण…
-
बीएसएनएलच्या १५ आधार सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली- केंद्र सरकारने मेक इन इंडिया…
-
भिवंडी शिळ रस्त्या बाबत केडीएमसीत महत्वाची बैठक संपन
कल्याण प्रतिनिधी- भिवंडी ते शिळ या २१ किलोमीटर ४ पदरी रस्त्याचे…
-
भिवंडी येथील वलपाडा परिसरात कोसळली इमारत,अनेक लोक ढिगाऱ्याखाली
नेशन न्यूज मराठी टीम. भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडी येथील वलपाडा परिसरातील…
-
भिवंडी इमारत दुर्घटना स्थळी वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांची भेट
प्रतिनिधी. ठाणे - भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंड येथील जीलानी बिल्डिंग…
-
राष्ट्रीय लॉजिस्टिक पोर्टल- मरीनचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि…
-
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. नागपूर/प्रतिनिधी - कृत्रिम बुध्दिमत्ता व इतर…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते ‘वन भवन’चे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - ‘वन भवन’ या वन…
-
भिवंडी लोकसभेसाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. भिवंडी/प्रतिनिधी - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी…
-
सीबीडीटीकडून प्राप्तिकर विभागाच्या नव्या रूपातील राष्ट्रीय वेबसाईटचा प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - करदात्यांना अधिक सुविधा…
-
'इग्नाईट' महाराष्ट्र कार्यशाळेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. रत्नागिरी/प्रतिनिधी - उद्योग संचालनालय, स्मॉल…
-
प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या स्वरूपात लागू
नेशन न्यूज मराठी टीम. दिल्ली / प्रतिनिधी - केंद्रीय महिला…
-
दोडी बुद्रुक ग्रामीण रुग्णालयाच्या विस्तारीत प्रसूतीगृह इमारतीचे लोकार्पण
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - ग्रामीण रुग्णालयांमधील प्रसूती सेवांचास्तर उंचावण्यासाठी…
-
भारतीय स्पर्धा आयोगाच्या मुंबईतील विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय अर्थ आणि…
-
मुंबई आमची बाल मित्रांची या अभियानाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांनी…
-
भिवंडी कोरोना लस साठा अपुरा ; फक्त दोनच ठिकाणी होणार लसीकरण
भिवंडी/प्रतिनिधी - शासनाकडून ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यास सध्या…
-
‘राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार ’ नव्या स्वरूपात
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारत…
-
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन
मुंबई/प्रतिनिधी - अकरावी प्रवेशासाठीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा…
-
भिवंडी मनपा आणिआगा खान एजन्सी फॉर इंडियाच्या वतीने जागतिक जल दिन साजरा
भिवंडी प्रतिनिधी -पाणी ही आपली मूलभूत गरज आहे. याचे महत्व…
-
भिवंडी ग्रामीण भागातील ३४ गावांच्या पाणी प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
ठाणे/संघर्ष गांगुर्डे - स्टेम प्रकल्पाद्वारे भिवंडी तालुक्यातील 34 गावांना होणारा…
-
भिवंडी, मुंब्रा येथे वीज ग्राहकांच्या तक्रारींसाठी महावितरणतर्फे नोडल अधिकारी नियुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा.…
-
भिवंडी लोकसभेसाठी शरद पवार आग्रही; बाळ्या मामा राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. भिवंडी/प्रतिनिधी - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी…
-
भिवंडी लोकसभेत ३६ उमेदवारांची ४३ नामनिर्देशनपत्रे वैध तर ५ उमेदवारांचे अर्ज अवैध
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी…
-
चांदवड उपजिल्हा रूगणालय येथे ऑक्सिजन जनरेशन प्लाँन्टचे उद्घाटन
नाशिक /प्रतिनिधी – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना आरोग्य कर्मी व…
-
नवी मुंबईत ‘आयुष इमारत संकुलाचे’ उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई - केंद्रीय आयुष तसेच, बंदरे, जहाजबांधणी…
-
राष्ट्रीय कृषी संमेलन- खरीप अभियान - २०२२ चे उद्घाटन
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली - कृषी मंत्री नरेंद्र…
-
‘मुंबई उपनगर ग्रंथोत्सव २०२२’ चे उत्साहात उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आपल्या जीवनाला वैचारिक दिशा…
-
नाशिकमध्ये माजी सैनिक केंद्राचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नाशिक/प्रतिनिधी - 23 मार्च 2024…
-
उत्सव गणेशाचा,जागर मताधिकाराचा ,गणेशोत्सवात भिवंडी मतदार नोंदणीसाठी अनोखी जनजागृती
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडीत मतदार नोंदणी कार्यक्रम निवडणूक तसेच महसूल विभागाने हाती…
-
महाराष्ट्र तांदूळ महोत्सवाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - शेतकरी ते थेट ग्राहक…
-
भिवंडी पोलिसांकडून पाच गुन्ह्याचा उलगडा, ५ आरोपींना अटक, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी. भिवंडी- भिवंडी शहरातील शांती नगर पोलिस ठाणे अंतर्गत मोठ्या प्रमाणात…
-
भिवंडी ठाणे महामार्गावर वाहतूक कोंडीची बिकट समस्या,वंचितचा आंदोलनाचा इशारा
भिवंडी प्रतिनिधी- भिवंडी ठाणे महामार्गावर सध्या एमएमआरडीए प्रशासनाच्या वतीने ठाणे भिवंडी…
-
मध्यवर्ती कारागृहाच्या दिवाळी मेळावा प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन
नाशिक /प्रतिनिधी - नाशिक मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांनी आपली कला व…
-
राष्ट्रपतींच्या हस्ते शेतकऱ्यांच्या अधिकारांसंदर्भातील पहिल्या जागतिक परिषदेचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - शेतकऱ्यांच्या…