नेशन न्युज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – ग्राहकांना निर्माण होत असलेले लक्षणीय अर्थसाहाय्यविषयक आणि सामाजिक आर्थिक धोके,विशेषतः युवा वर्ग आणि बालकांसाठी असलेले धोके विचारात घेऊन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज ऑनलाईन सट्टेबाजीच्या साईट्सच्या जाहिराती आणि या साईट्सच्या छुप्या(सरोगेट) जाहिरातींना प्रतिबंध करण्यासाठी तशा प्रकारची सक्त ताकीद देणाऱ्या दोन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पहिली सूचना खाजगी टीव्ही वाहिन्यांसाठी आणि दुसरी सूचना ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी जारी करण्यात आली आहे. मंत्रालयाने यापूर्वी 13 जून 2022 रोजी ऑनलाईन सट्टेबाजी प्लॅटफॉर्म्सच्या जाहिरातींची प्रसिद्धी टाळण्याची मार्गदर्शक सूचना वृत्तपत्रे, खाजगी टीव्ही वाहिन्या आणि डिजिटल वृत्तवाहिन्यांना केली होती.
त्यानंतर सरकारच्या असे निदर्शनास आले की टीव्हीवरील अनेक क्रीडा वाहिन्या, त्याचबरोबर ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरून परदेशी ऑनलाईन बेटींग प्लॅटफॉर्म्सच्या त्याचबरोबर त्यांच्या सरोगेट न्यूज वेबसाईट्सच्या जाहिराती प्रसारित करत आहेत. या मार्गदर्शक सूचना जारी करताना, या प्रकारांची पुष्टी करणारे फेयरप्ले, पारीमॅच, बेटवे, वुल्फ777 आणि 1xBet यांसारख्या परदेशी बेटिंग प्लॅटफॉर्म्सच्या प्रत्यक्ष आणि छुप्या जाहिरातींचे दाखले देण्यात आले आहेत.
या सूचनांमध्ये मंत्रालयाने अशी माहिती दिली आहे की परदेशी ऑनलाईन बेटिंग प्लॅटफॉर्म्स न्यूज वेबसाईट्सचा वापर डिजिटल मीडियावर बेटिंग प्लॅटफॉर्म्सची जाहिरात करण्यासाठी छुपे उत्पादन म्हणून करत आहेत. अशा प्रकारच्या सरोगेट न्यूज वेबसाईटसचे लोगो आणि या बेटिंग प्लॅटफॉर्म्समध्ये कमालीचे साधर्म्य असल्याचे अशा प्रकरणांमध्ये मंत्रालयाला आढळले आहे. या बेटिंग प्लॅटफॉर्म्सची किंवा या न्यूज वेबसाईट्सची भारतात कोणत्याही कायदेशीर प्राधिकरणाकडे नोंदणीदेखील झालेली नाही याकडे मंत्रालयाने लक्ष वेधले आहे. या वेबसाईट्स बातम्यांच्या आडून छुप्या जाहिरातींच्या माध्यमातून सट्टेबाजी आणि जुगाराला प्रोत्साहन देत आहेत.
देशाच्या बहुतांश भागांमध्ये सट्टेबाजी आणि जुगार बेकायदेशीर असल्याने असे बेटिंग प्लॅटफॉर्म्स आणि त्यांची छुपी उत्पादने ही देखील बेकायदेशीर आहेत, असे मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. ग्राहक संरक्षण कायदा 2019, केबल टीव्ही नेटवर्क नियामक कायदा 1995 आणि माहिती तंत्रज्ञान नियम 2021 यातील तरतुदींवर या मार्गदर्शक सूचना आधारित आहेत. या जाहिराती संबंधित विविध कायद्यांशी सुसंगत नाहीत आणि टीव्ही वाहिन्या त्याचबरोबर डिजिटल न्यूज पब्लिशर्सना अशी सक्त ताकीद देण्यात येत आहे की अशा प्रकारे बेटिंग प्लॅटफॉर्म्स किंवा सरोगेट न्यूज वेबसाईट्सची जाहिरात करू नये आणि या निर्देशांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी आठवण देखील टीव्ही वाहिन्यांना करून देण्यात येत आहे. त्याच प्रकारे ऑनलाईन जाहिरातींच्या मध्यस्थांना देखील मंत्रालयाने भारतीय प्रेक्षकांना अशा जाहिरातींद्वारे लक्ष्य करू नका असा सल्ला दिला आहे.
सट्टेबाजी आणि जुगारामुळे ग्राहकांसाठी लक्षणीय अर्थसाहाय्यविषयक आणि सामाजिक- आर्थिक धोके निर्माण झाले आहेत विशेषतः युवा वर्ग आणि बालकांना त्याचा धोका आहे, असे मंत्रालयाने सांगितले आहे. त्यामुळे सार्वजनिक हित विचारात घेऊन ऑफलाईन किंवा ऑनलाईन सट्टेबाजी/जुगार यांना जाहिरातींद्वारे प्रोत्साहन देऊ नये असे मंत्रालयाने सुचवले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या दोन मार्गदर्शक सूचनांसंदर्भात ग्राहक व्यवहार विभागाशी विशेष सल्लामसलत केली आहे.
Related Posts
-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते डिजिटल इंडिया पुरस्कार-२०२२ प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू…
-
मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल प्रसारमाध्यमांवर ऑनलाइन सट्टेबाजीच्या जाहिरातीना मनाई
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - ऑनलाइन सट्टेबाजी मंचाचा…
-
डिजीलॉकर मध्ये आता आरोग्यविषयक कागदपत्रे डिजिटल पद्धतीने संग्रहित करता येणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - डिजीलॉकर हे इलेक्ट्रॉनिक्स…
-
निवडणूक प्रचारासाठी बालकांचा वापर केल्यास होणार कठोर कारवाई
NATION NEWS MARATHI ONLINE. नवी दिल्ली/प्रतिनिधी - प्रचारसभांमध्ये केल्या जाणाऱ्या…
-
अमरावतीत देशातील पहिला डिजिटल संत्रा बाजार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - संत्रा उत्पादक बाजार…
-
मोहोळ नगर परिषदेच्या जाहिराती जमिनीपासून पाच फूट उंचीवर लावण्याची युवा भीम सेनेची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर- मोहोळ नगरपरिषदेने भिंतीवर लावलेल्या जाहिरातीवर नागरिक लघुशंका करीत…
-
‘ॲसिड’ चा अल्ट्रा झकासवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - स्त्रीच्या सौंदर्यात भर…
-
जागतिक महिला दिनानिमित्त ‘लोकशाही’ चित्रपटाचा 'अल्ट्रा झकास ओटीटी'वर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - नुकत्याच संपूर्ण महाराष्ट्रात…
-
आक्षेपार्ह जाहिराती असलेली आयुर्वेदिक औषधे जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - अन्न व औषध प्रशासन…
-
डिजिटल ऑन्कोलॉजी केंद्राद्वारे कर्करोग उपचार व देखभालीत होणार मदत
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी- डिजिटल तंत्रज्ञान आणि उपलब्ध साधनांच्या…
-
वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने डिजिटल अभिवाचन स्पर्धा
मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि…
-
सुरक्षित डिजिटल व्यवस्थेसाठी मोबाइल वापरकर्ता संरक्षण विषयक दोन सुधारणा जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - देशात,…
-
शेतकरी बांधवांना सातबाऱ्याची डिजिटल प्रत विनामूल्य व घरपोच
अमरावती/प्रतिनिधी - शासनाने संगणकीकृत सातबारा, ऑनलाइन फेरफार, जलद गतीने जमिनींची मोजणी, सामूहिक गावठाण…
-
सोलापूर विद्यापीठात टीव्ही व रेडिओ स्टुडिओ आणि पुरातत्व संग्रहालयाचे ऑनलाइन उद्घाटन
सोलापूर प्रतिनिधी- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये टीव्ही व रेडिओ…
-
डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरासाठी महापारेषणला सुवर्ण पारितोषिक
मुंबई प्रतिनिधी - नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या 71व्या ऑनलाईन…
-
‘जेलर’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर लवकरच अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - प्रेम, कुटुंब ,मैत्री…
-
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र,पदाधिकाऱ्यांची झाली घोषणा
मुंबई/प्रतिनिधी -डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची घोषणा…
-
भारतीय लष्कराच्या गणवेशाचे अनधिकृत उत्पादन केल्यास होणार कारवाई, विक्रेत्यांनाही इशारा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय लष्कराने त्यांच्या नव्याने…
-
फी कमी न केल्यास विद्यार्थ्यांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. धुळे/प्रतिनिधी - स्पर्धापरिक्षा उत्तीर्ण करून…
-
प्रत्येक शेतकऱ्याला २ ऑक्टोबरपासून मिळणार डिजिटल सातबारा
शिर्डी/प्रतिनिधी- राज्य शासनाने ऑनलाईन प्रणालीला प्राधान्य दिले आहे. सातबारा दुरुस्तीसह…
-
ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे जारी होणार १० लाख डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्रे
मुंबई/प्रतिनिधी - बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने…