नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – संरक्षण मंत्रालयाच्या माजी सैनिक कल्याण विभागाचे सचिव म्हणून विजय कुमार सिंह यांनी सप्टेंबर 19, 2022 रोजी कार्यभार स्वीकारला. सिंह हे पंजाब केडरचे 1990 च्या तुकडीतील प्रशासकीय अधिकारी (आयएएस) असून, त्यांना 32 वर्षांपेक्षा जास्त काळ प्रशासनाचा अनुभव आहे.
विजय कुमार सिंह यांनी अलीकडेच वस्त्रोद्योग मंत्रालयात विशेष सचिव म्हणून काम केले आहे. त्या पदावरील नियुक्ती पूर्वी त्यांनी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागात सहसचिव म्हणून काम केले होते. पंजाबमधील आपल्या कारकीर्दीत त्यांनी सशस्त्र दलाच्या सेवेतील तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांशी व्यापक संवाद साधला.