नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – केंद्रीय लोकसेवा आयोगाने 04 सप्टेंबर 2022 रोजी राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा (II) 2022 साठी लेखी परीक्षा घेतली होती. त्याच्या निकालाच्या आधारे, 2 जुलै 2023 पासून सुरू होणाऱ्या 150 व्या अभ्यासक्रमासाठी आणि 112 व्या भारतीय नौदल अकादमी अभ्यासक्रमासाठी (आयएनएसी) राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या शाखांमध्ये प्रवेशासाठी संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळ (एसएसबी) द्वारे खाली नमूद केलेल्या अनुक्रमांकाचे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध आहे.
यादीत अनुक्रमांक असलेल्या सर्व उमेदवारांची उमेदवारी तात्पुरत्या स्वरुपात आहे. परीक्षेसाठी, त्यांच्या प्रवेशाच्या अटींनुसार, “उमेदवारांना लेखी निकाल जाहीर झाल्यापासून दोन आठवड्यांच्या आत भारतीय सैन्य भर्ती संकेतस्थळ joinindianarmy.nic.in वर ऑनलाईन नोंदणी करण्याची विनंती केली जात आहे. त्यानंतर यशस्वी उमेदवारांना निवड केंद्रे आणि एसएसबीच्या मुलाखतीसाठी तारखा दिल्या जातील. त्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर कळवल्या जातील. यापूर्वी संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या कोणत्याही उमेदवाराला तसे करण्याची आवश्यकता नाही. कोणतीही शंका/लॉग इन समस्या असल्यास, dir-recruiting6-mod[at]nic[dot]in वर इमेल पाठवावा.
“उमेदवारांना एसएसबी मुलाखतीदरम्यान संबंधित सेवा निवड मंडळांना (एसएसबी) वय आणि शैक्षणिक पात्रतेची मूळ प्रमाणपत्रे सादर करण्याची विनंती केली जात आहे.” उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवू नयेत. कोणत्याही अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी कोणात्याही कामाच्या दिवशी आयोगाच्या प्रवेशद्वार ‘सी’ जवळील सुविधा खिडकीवर वैयक्तिकरित्या किंवा दूरध्वनी क्रमांक 011-23385271/011-23381125/011-23098543 वर सकाळी 10:00 ते 17:00 या दरम्यान संपर्क साधावा. याशिवाय एसएसबी/मुलाखतीशी संबंधित बाबींसाठी उमेदवार 011-26175473 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतात किंवा सैन्यासाठी joinindianarmy.nic.in या क्रमांकावर प्रथम पसंती म्हणून संपर्क करू शकतात, नौदल,/नौदल अकादमीसाठी पहिली पसंती म्हणून 011-23010097/ Email:officer-navy[at]nic[dot]in किंवा joinindiannavy वर आणि हवाई दलासाठी पहिली पसंती म्हणून 011-23010231 Extn.7645/7646/7610 किंवा www.careerindianairforce.cdac.in वर उमेदवार संपर्क करु शकतात.
उमेदवारांच्या गुणपत्रिका, अंतिम निकाल प्रकाशित झाल्यापासून पंधरा (15) दिवसांच्या आत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील. (एसएसबी मुलाखती संपल्यानंतर) आणि तीस (30) दिवसांच्या कालावधीसाठी संकेतस्थळावर उपलब्ध राहतील.