महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ganapati लोकल बातम्या

केडीएमसीच्या गणेश दर्शन स्पर्धेचा निकाल जाहीर

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने महापालिका क्षेत्रातील ५, ७, १० दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी आयोजित केलेल्या श्री गणेश दर्शन स्पर्धेचा निकाल परिक्षक मंडळाने वंदना गुळवे, उप आयुक्त (माहिती व जनसंपर्क) यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या स्पर्धेत 38 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत सहभागी झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची महापालिकेने नियुक्त केलेल्या परिक्षक मंडळाने दिनांक २ सप्टेंबर व ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाहणी केली. परिक्षक मंडळाने दिलेल्या स्पर्धेचा निकाल वंदना गुळवे उप आयुक्त (माहिती व जनसंपर्क) यांनी घोषित केला आहे.

यामध्ये गणेश मुर्तीकरिता देण्यात येणाऱ्या पारितोषिकात कल्याण विभागात कासारहाट येथील बाल गणेश मंडळ प्रथम, महाजनवाडी हॉल येथील हिराबाग गणेशोत्सव मंडळ द्वितीय, बेतूरकर पाडा येथील जागृती मित्र मंडळ तृतीय तर सार्वजनिक सेवा विचार मंडळाला उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. तर डोंबिवली विभागात प्रथम क्रमांक जोशी मित्र मंडळ, द्वितीय शिवनेरी मित्र मंडळ, तृतीय क्रमांक बाल गोपाळ मंडळाने पटकावला आहे.

त्याचप्रमाणे सजावट स्पर्धेकरिता जोशीबाग येथील शिवनेरी क्रीडा मंडळाला प्रथम क्रमांक, श्रीमंत बाल मित्र गणेश मंडळाला द्वितीय क्रमांक, जय गणेश मित्र मंडळाला तृतीय क्रमांक, सार्वजनिक सेवा विचार मंडळ आणि तरुण उत्साही मंडळ यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले आहे. तर डोंबिवली विभागात जोशी मित्र मंडळ प्रथम आणि अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×