नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे/प्रतिनिधी – स्वस्थ भारत मोहिमेत राज्यातील महिला व बालविकास विभागाच्या अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. या अंगणवाडी सेविकाचे मानधन वाढविण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून लवकरच निर्णय घेईल, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथे केले.
महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या वतीने आयोजित 5 व्या राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते व माजी महापौर नरेश म्हस्के, आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या उपस्थितीत ठाण्यातील काजूवाडी येथील महानगरपालिका शाळेत झाला. यावेळी श्रीमती सुमित्रा गुप्ता, उपायुक्त गोकुळ देवरे, एकात्मिक सेवा योजनेचे उपायुक्त विजय क्षीरसागर यांच्यासह लाभार्थी महिला, बालके व नागरिक उपस्थित होते.
राष्ट्रीय पोषण महिना शुभारंभानिमित्त सकस पाककृती प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री मंगलप्रभात लोढा व श्रीमती सुमित्रा गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री लोढा यांनी अंगणवाडीतील बालकांशी व अंगणवाडी सेविकांशी संवाद साधून पोषण आहाराविषयी माहिती घेतली. गरोदर महिला व सुदृढ बालकांना सकस फ्रूट बास्केट, स्तनदा मातांना बेबी केअर किटचे वाटप मंत्री लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.
मंत्री लोढा म्हणाले की, राज्यातील एक लाख 10 हजार अंगणवाड्याच्या माध्यमातून राज्यातील बालके व गरोदर महिलांची काळजी घेण्याचे काम अंगणवाडी सेविका करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मूल सक्षम तर देश सक्षम असा संदेश दिला होता. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन काम करत आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसंदर्भात विभागाने प्रस्ताव पाठवावा त्यावर मंत्रिमंडळात योग्य निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
श्रीमती अग्रवाल यांनी प्रास्ताविकात पोषण महिना कार्यक्रमाची माहिती दिली. राज्यात 1 ते 30 सप्टेंबर या काळात 1 लाख 10 हजार अंगणवाड्यांच्या माध्यमातून पोषण महिना उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. बालकांचे वजन तपासणे, सकस आहारासंबंधी जनजागृती करणे, महिला व बालकांचे आरोग्य, शिक्षण याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच स्वस्थ बालक-बालिका स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीमती अग्रवाल यांनी यावेळी दिली. क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पोषण शपथ घेण्यात आली. तसेच अंगणवाडी सेविकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
Related Posts
-
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डॉ. श्रीकांत शिंदे…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
प्रतिनिधी. मुंबई -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त…
-
‘महायुवा ॲप’चे मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई- शासकीय योजना, रोजगार संधी आणि…
-
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिननिमित्त वर्षा निवासस्थानाच्या…
-
महाराष्ट्रातील तीन पोलीसांना राष्ट्रपती यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पोलीस सेवेत अदम्य…
-
पहलवान साहेब जीवन चरित्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सर्कसपटू मल्ल…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते ‘वन भवन’चे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - ‘वन भवन’ या वन…
-
पशुसंवर्धनविषयी केंद्राकडे मंत्री सुनील केदार यांच्या विविध मागण्या
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - जनावरांचा विम्याचा निधी,…
-
‘लोकराज्य’च्या महापर्यटन विशेषांकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या…
-
‘सर्वांसाठी पाणी’ धोरणाचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई महानगरपालिका देशात सर्वोत्तम…
-
आरपीएफच्या कर्मचाऱ्यांचा रेल्वेमंत्री यांच्या हस्ते सत्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - रेल्वे संरक्षण दलाचा…
-
मुंबईत मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात काळे झेंडे दाखवत मनसेची घोषणाबाजी
मुंबई / प्रतिनिधी - सायन येथील षण्मुखानंद हॉलमध्ये बांधकाम मंत्री…
-
सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते वितरण
नवी दिल्ली/प्रतिनिधी - सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांचे राष्ट्रपती राम नाथ…
-
ई-ऊसतोड कल्याण’ ॲपचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण
बीड/प्रतिनीधी - ऊसतोड कामगार ऊसतोडणीसाठी कारखान्यांवर जाण्यासाठी निघण्यापूर्वीच ऊसतोड कामगारांची…
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बँकांच्या ‘सीएसआर’ निधीतील कामांचे लोकार्पण
प्रतिनिधी. पुणे - विविध खासगी बँकांनी सामाजिक बांधिलकी राखत त्यांच्या…
-
बीबीएनजीच्या उद्यम कौस्तुभ पुरस्कारांचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वितरण
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/संघर्ष गांगुर्डे – खुल्या प्रवर्गातील तरुणांना शैक्षणिक,…
-
दिवाळीसाठी ‘आनंदाचा शिधा’ वितरणाचा अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई/संघर्ष गांगुर्डे - दिवाळी निमित्ताने राज्यातील सुमारे ७ कोटी नागरिकांना…
-
कल्याण डोंबिवलीमधील ४४५ कोटींच्या रस्त्यांचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/संघर्ष गांगुर्डे - राज्यातील तसेच शहरातील…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा
पंढरपूर/ प्रतिनिधी - पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरु दे. भक्तिरसात,…
-
कल्याणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी…
-
पुण्यात राज्यपालांच्या हस्ते दादा जे. पी. वासवानी यांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकिटाचे अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे / प्रतिनिधी - साधू वासवानी…
-
१४ राज्यांमधील १६६ सीएनजी स्टेशन्सचे मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते लोकार्पण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
ठाणे जिल्ह्यातील जलसंपदा विभागाची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा, यासाठी…
-
महाराष्ट्र पर्यटनाचे सुधारित संकेतस्थळ व महाराष्ट्र टुरिझम मोबाईल ॲपचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना काळातही महाराष्ट्राने पर्यटन विकासासाठी केलेले काम प्रशंसनीय आहे.…
-
महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथील विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
नाशिक/प्रतिनिधी - महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांचे संरक्षण करणारे…
-
मुंबईतील मेट्रो मार्गिकेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते एमटीडीसीच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्राला नैसर्गिक, ऐतिहासिक, पौराणिक, भौगोलिक असे विविधांगी पर्यटनवैभव लाभले…
-
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयाचे वीरमाता अनुराधा गोरे यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी. मुंबई - शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मंत्रालयातील…
-
डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांच्या पुस्तिकेचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. गडहिंग्लज/प्रतिनिधी - ओंकार शिक्षण प्रसारक मंडळ…
-
राज्यपालांच्या हस्ते ‘विज्ञान विश्व’चे प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषेतून विज्ञान प्रसाराच्या हेतूने सुरु केलेल्या ‘विज्ञान विश्व’…
-
महापौर हा भाजपाचाच होणार -मंत्री रवींद्र चव्हाण
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- २०१९ साली कल्याण डोंबिवली महापालिकेत…
-
दैवत विश्रामगृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
प्रतिनिधी.अलिबाग - स्थानिक लोकाधिकार समितीने विविध उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ…
-
क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन
भारतातील पहिल्या शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त…
-
नवाब मलिक यांच्या अटकेनंतर कल्याणात राष्ट्रवादीची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे…
-
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला / प्रतिनिधी - धनगर समाजाला…
-
वायलेनगर मध्ये विकास कामाचे आमदारांच्या हस्ते पूजन
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील वायलेनगर मध्ये चौकांना नवी…
-
संगमनेर तालुक्यात आरोग्य पोषण अभियानास सुरुवात
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - लहान बालके…
-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री यांचे अभिवादन
मुंबई/ प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री श्री.…
-
खा. हेमंत पाटील यांच्या अटकेच्या मागणीसाठी मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - डॉ शंकरराव चव्हाण वैद्यकीय…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणे १८ नोव्हेंबरला डोंबिवलीत
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या म्हणजेच १८…
-
कल्याण मध्ये नाना पटोले यांच्या विरोधात भाजपची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/p6VcYFNbPkE कल्याण- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…
-
अमरावतीच्या युवक काँग्रेसच्या वतीने रवी राणा यांच्या विरोधात निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - युवा स्वाभिमान…
-
कल्याण मध्ये अजित पवार यांच्या विरोधात भाजपची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात विरोधी पक्षनेते…