नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कॅन्सर म्हणजेच कर्करोग या आजाराविषयी समाज अधिक सतर्क व्हावा यासाठी कल्याण-डोंबिवली महानगर पालिका हद्दीत असणाऱ्या ‘बालाजी आंगन काॅम्पलेक्स’ने पुढाकार घेतला आहे. २०२२च्या गणेशोत्सवात त्यांनी ‘टाटा मेमोरिअल हॉस्पिटल’ची उभारणी केली आहे.
बालाजी आंगन कॉम्प्लेक्स’चं गणेशोत्सवाचं यंदाचं सातवं वर्ष आहे. कॅन्सरविषयी जनजागृती आणि टाटा मेमोरीयल रुग्णालयाचा देखावा तेजस सौंदणकर, दिव्यांश सिंघ, स्वप्नील घाडी, राहुल दळवी, मंगेश तेली या कलाकारांनी उभा केला आहे. या कलाकारांना विनय हडकर, हिमांशू ढंग, प्राजक्ता केळुस्कर, यशश्री राऊत, सोनाली उकर्डे , विशाल साळवे, प्रथमेश मेस्त्री, शुभम सावंत यांनी मदत केली आहे.
“दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही देखाव्यातून सामजिक संदेश देण्याचं प्रयत्न करत आहोत. या वर्षी आम्ही कॅन्सर या आजारावर आरास उभी करून कॅन्सर बदल जनजागृती करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आज हा आजार बहुतेक लोकांच्या घरी आहे. पण या आजारावरचे उपचार मर्यादित हॉस्पिटलमध्ये होतात. मुख्य म्हणजे त्या आजारावर उपचार करण्यासाठी टाटा हाॅस्पिटलचं योगदान खरंच मोलाचं आहे. सर जेआरडी टाटांच्या विचारांना मानवंदना म्हणून आम्ही टाटा मेमोरियल हॉस्पिल ची उभारणं देखाव्यामध्ये केली आहे. हा देखावा उभा करण्याची संकल्पना ही रुपेश राऊत, अभिजित बिल्ले, सुशांत भोवड, ओमकार वायंगणकर यांची असल्याचे वसाहतीच्या गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख प्रवीण केळुस्कर यांनी सांगितले.
“१९४१ सली सुरू झालेल्या या टाटा मेमोरिअल हॉस्पिटलने लाखो कॅन्सर या आजाराने बाधीत रुग्णांना जीवन दान दिलं आहे. कॅन्सरचे उपचार समान्य माणसांना परवडतील असे हे एकमेव हॉस्पिटल अहे. कल्याण-स डोंबिवलीत अशा एका हॉस्पिटलची खरच खूप गरज आहे; जेणे करून भविष्यात कसारा-कर्जत-नाशिकडून येणाऱ्या रुग्णांसाठीसाठी हे एक मध्य ठिकाण बनेल”, अशी माहिती ‘बालाजी आंगन कॉम्प्लेक्सच्या गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख प्रवीण केळुस्कर यांनी दिली.