महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ठाणे थोडक्यात

कोनगाव परिसरात ३७ वीज चोरांविरुद्ध कारवाई,२० लाख २८ हजारांची वीजचोरी उघडकीस

नेशन न्यूज़ मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी– महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील कोनगाव परिसरात वीजचोरी करणाऱ्या ३७ जणांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत २० लाख २८ हजार रुपये किंमतीची वीजचोरी उघडकीस आणण्यात महावितरणच्या पथकाला यश आले. वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार कोनगाव व पिंपळास येथील ३७ जणांविरुद्ध भिवंडीतील शांतीनगर पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

गंगाराम सिताराम गायकवाड, सुखदेव राजाराम गायकवाड, रमेश चिंधु पाटील, सुदाम सुंदर गायकवाड, कैलास काशिनाथ गायकवाड, पुंडलिक चिंतामण गायकवाड, उमेश अशोक पाटील, बाळु जयराम गायकवाड, दिपक चंद्रकांत गायकवाड, धनश्री निलेश पाटील, उषा श्रीधर गायकवाड, कमलाकर गंगाराम गायकवाड, सुरेश जयराम पाटील, किरण सदु पाटील, हनुमान महादेव पाटील, सचिन गोरखनाथ पाटील, गोपीनाथ गणपत पाटील (सर्व राहणार पिंपळास) व संभाजी बबन पाटील, बाबू दुंदा पाटील, गुलाब राधे पाटील, बळवंत वामन पाटील, हेमंत नरेश पाटील, विलास मधूकर पाटील, मुरलीधर दत्तु पाटील, बिल्ला मंगेश पाटील, मंगेश बलु पाटील, पप्पू मंगेश पाटील, गणपत बी. पाटील, अविनाश मणिक जोशी, पिंटु मारुती जोशी, वंदना बिजु पाटील, श्रीराम सुकऱ्या पाटील, प्रमोद राजाराम पाटील, पंकज कबीर भंडारी, श्याम शंकर पाटील, वासंती तुकाराम पाटील, नारायण विष्णु कराळे (सर्व राहणार कोनगांव) यांच्याविरुद्ध भिवंडीतील शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या सर्वच आरोपींनी वीज मीटरला येणाऱ्या केबलला टॅपिंग करून वीज मीटर टाळून परस्पर वीजवापर केल्याचे आढळून आले आहे.

उपविभागीय अभियंता गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता अभिषेक व्दिवेदी व त्यांच्या टिमने ही कारवाई केली. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा व दंडाची तरतूद असून कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×