नेशन न्यूज न्मराठी टीम.
शहापूर/प्रतिनिधी – एका शेतकऱ्याच्या राहत्या घरात बिबट्या घुसला होता. मात्र शेतकऱ्याने हिंमत दाखूवन प्रसंगावधान राखत त्या बिबट्याला घरातच कोंडून ठेवल्याने मोठा अनर्थ टळला . या घटनेचा थरार शहापूर तालुक्यातील उंबरखांड गावातील एका घरात घडला आहे. तर या बिबट्याला जेरबंद करण्यास वन विभागाच्या रेस्क्यु टीमला सुमारे १० तास अथक प्रयत्न केल्यानंतर हा बिबट्या वन विभागाला जेरबंद करण्यात यश आले आहे.
शहापूर तालुक्यातील उंबरखांड गावा लहु नारायण निमसे हे कुटंबास राहून शेती करतात. काल पहाटेच्या (सोमवार) दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान बिबट्याने अचानक घराच्या आवारात शिरकाव केला. त्यावेळी घराच्या पाठीमागे असलेल्या पाळीव जनावर व कोंबड्या ओरडण्याचा जोर जोरात आवाज आल्याने घरातील सदस्य मधुकर लहु निमसे यांना जाग आली. तर बाजुच्या घरात त्यांचा मुलगा झोपला होता. तोपर्यत बिबट्या त्याच्या घरातील एका खोलीत शिरला होता. हे पाहताच मधुकर यांनी हिंमत दाखवून प्रसंगावधान राखत बिबट्या शिरलेल्या खोलीचा दरवाजा बाहेरून लावुन घेतला. त्यानंतर तातडीने शहापूर वनविभागाला बिबट्या घरात शिरल्याची माहिती दिली.तर घरातील महिला सदस्यांनी घरातील सर्वच कुटूंबाला तातडीने झोपोतून उठवून बाहेर काढण्यात मदत केली आणि घटनेचा थरारक प्रसंगही सांगितला.
बिबट्या घरात शिरल्याची माहिती मिळाली असता पहाटेच लवकरच शहापूर विभागाचे उपवनसंरक्षक सचिन रेपाळे , धसईचे आरएफओ दर्शन ठाकुर यांचेसह खर्डी , शहापूर, विहीगाव, वाशाळा येथील आरएफओ व वन कर्मचारी यांची रेस्क्यु टीम त्याठिकाणी रवाना झाली होऊन बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यावेळी बिबट्यावर नेम धरुन त्याला एक वेळा डॉट करून बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सफल ठरला नाही. नंतर संजय गांधी नॅशनल पार्कच्या रेक्सू टीमचे अधिकारी यांनी सांगितले कि, आमच्या रेक्सू टिमने बिबट्याला डॉट करून बेशुद्ध केले असून हा बिबट्या मादी जातीचा असून दिड वर्षाचा आहे. तर त्याचे अंदाजे वजन तिस ते पस्तीस किलो वजनाचा हा बिबट्या असल्याची माहिती पशु वैद्यकीय डॉक्टरांनी दिली आहे.
शेतकऱ्याच्या घरात शिरलेल्या बिबट्याला संजय गांधी नॅशनल पार्कच्या रेक्सू टिमने अखेर दुपारी १२ वाजल्याच्या सुमारास दुसऱ्यांदा नेम धरून डॉट करून त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर या बिबट्याला वन विभागाच्या पथकाने जाळ्यात जेरबंद करून वन पथकाच्या व्हॅनमध्ये टाकले. आता या बिबट्याची आरोग्य तपासणी करून आज संध्याकाळपर्यत त्याला निर्सगाच्या अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती शहापूर उपवनसंरक्षक सचिन रेपाळ यांनी दिली आहे.